logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुरुड नगरपरिषदेने शहरातील नळधारकांवर लादलेल्या नळपट्टी दरवाढीच्या विरोधात मुरुडमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एल्गार पुकारला आहे. शहरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना नळपट्टीत वाढ करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले असून ही अन्यायकारक दरवाढ तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांना तक्रारवजा निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर शहरातील सजग नागरिक उदय चौलकर, प्रभाकर मसाल, जयंत शेडगे, उल्हास चौलकर यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीपूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी अचानक नळपट्टी दरवाढ लागू केली. ही दरवाढ कोणतीही व्यापक चर्चा किंवा नागरिकांचा सहभाग न घेता करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, पेण आदी नगरपरिषदांनी अशी दरवाढ केलेली नसताना मुरुड शहरातील नळधारकांवरच ही वाढ लादण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. नगरपरिषदेत त्या काळात प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी नसताना प्रशासनाने असा निर्णय घेणे योग्य आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. जनतेवर आर्थिक भार टाकणारे निर्णय घेताना पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, मुरुड शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती समाधानकारक नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. शहरात नागरिकांना दिवसातून केवळ एक ते दीड तास पाणीपुरवठा केला जातो. तोही अनेकदा कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिकांना पाण्याची साठवणूक करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय शहरातील जलशुद्धीकरण यंत्रणेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून आगामी उन्हाळ्याच्या काळात पाण्याची टंचाई आणि दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुधारण्याऐवजी नळपट्टी दरवाढ लादणे अन्यायकारक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सदरची दरवाढ तात्काळ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. सोमवारी होणाऱ्या नगरसेवकांच्या सभेत या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन नळपट्टी दरवाढीचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुरुडमधील या दरवाढीच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये वाढत असलेला संताप लक्षात घेता नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

17 hrs ago
user_Raigad news
Raigad news
अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दूरदर्शन की पुरानी यादें 😮‍💨😔😥
    1
    दूरदर्शन की पुरानी यादें 😮‍💨😔😥
    user_Hitesh Parmar
    Hitesh Parmar
    Video Creator मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    33 min ago
  • समाजवादी पार्टी के नेता अखिलेश यादव ने बढ़ती महंगाई और गैस सिलेंडर की कीमतों को लेकर सरकार पर बड़ा हमला बोला। उन्होंने कहा कि अब सरकार की जिम्मेदारी बनती है कि सिलेंडर कैसे भरे जाएंगे। अगर चीजें इतनी महंगी हो जाएंगी तो आम आदमी के हाथ से निकल जाएंगी। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अगर ऐसा ही दो हफ्ते और चला तो लोगों को लकड़ी का इंतजाम करना पड़ेगा। Akhilesh Yadav’s sharp reaction on rising inflation and LPG gas cylinder prices is now making headlines. Watch this short news update. Police Vision Times
    1
    समाजवादी पार्टी के नेता अखिलेश यादव ने बढ़ती महंगाई और गैस सिलेंडर की कीमतों को लेकर सरकार पर बड़ा हमला बोला। उन्होंने कहा कि अब सरकार की जिम्मेदारी बनती है कि सिलेंडर कैसे भरे जाएंगे। अगर चीजें इतनी महंगी हो जाएंगी तो आम आदमी के हाथ से निकल जाएंगी। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अगर ऐसा ही दो हफ्ते और चला तो लोगों को लकड़ी का इंतजाम करना पड़ेगा।
Akhilesh Yadav’s sharp reaction on rising inflation and LPG gas cylinder prices is now making headlines. Watch this short news update.
Police Vision Times
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    41 min ago
  • Post by Lokhit Hindi
    1
    Post by Lokhit Hindi
    user_Lokhit Hindi
    Lokhit Hindi
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    1
    गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai
    1
    नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो।
#viral #viralreels #latest #trend #mumbai
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    11 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by RNN CHANNEL
    1
    Post by RNN CHANNEL
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Lokhit Hindi
    1
    Post by Lokhit Hindi
    user_Lokhit Hindi
    Lokhit Hindi
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.