logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पूर्णा येथे धावत्या रेल्वेच्या धडकेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू पूर्णा (प्रतिनिधी) – तालुक्यातील गौर शिवारात पूर्णा–नांदेड रेल्वेमार्गावर शनिवारी धावत्या रेल्वेची धडक लागून एका ३५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव कैलास चिंतामणी जोगदंड (वय ३५, रा. गौर, ता. पूर्णा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोगदंड हे शनिवारी सकाळी घरातून पूर्णा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्याआधी ते रेल्वेमार्गालगत असलेल्या आपल्या शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास गौर शिवारातील पूर्णा ते चुडावा दरम्यानच्या रेल्वेमार्गावरून जात असताना त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती संबंधित रेल्वे चालकाने चुडावा स्टेशन मास्टरमार्फत पोलिसांना दिली. माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, फौजदार नारमोड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा असून धडकेत मृताच्या डोक्याचे गंभीर नुकसान झाले आहे. तसेच शरीराचे काही अवयव वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास बिट जमादार राठोड करीत आहेत. मृताच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गौर गावावर शोककळा पसरली आहे.

9 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
9 hrs ago

पूर्णा येथे धावत्या रेल्वेच्या धडकेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू पूर्णा (प्रतिनिधी) – तालुक्यातील गौर शिवारात पूर्णा–नांदेड रेल्वेमार्गावर शनिवारी धावत्या रेल्वेची धडक लागून एका ३५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव कैलास चिंतामणी जोगदंड (वय ३५, रा. गौर, ता. पूर्णा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोगदंड हे शनिवारी सकाळी घरातून पूर्णा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्याआधी ते रेल्वेमार्गालगत असलेल्या आपल्या शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास गौर शिवारातील पूर्णा ते चुडावा दरम्यानच्या रेल्वेमार्गावरून जात असताना त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती संबंधित रेल्वे चालकाने चुडावा स्टेशन मास्टरमार्फत पोलिसांना दिली. माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, फौजदार नारमोड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा असून धडकेत मृताच्या डोक्याचे गंभीर नुकसान झाले आहे. तसेच शरीराचे काही अवयव वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास बिट जमादार राठोड करीत आहेत. मृताच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गौर गावावर शोककळा पसरली आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    1
    शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    1
    जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी..
जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे.
या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    1
    Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.
    3
    शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    1
    (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.  बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.