logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

९०० खाटांचे ठाणे जिल्हा सुपरस्पेशलिटी रुग्णालय सज्ज,उद्घाटन कधी? ठाणे: जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी ९०० खाटांचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालय इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी याठिकाणी ८ मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. याठिकाणी स्वतंत्र विद्युतवहिनी जोडणी द्यावी लागणार असून विद्युतवहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय सज्ज असले तरी वीज जोडणीमुळे तीन ते चार महिने लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे शंभर वर्षांपूर्वी विठ्ठल सायन्ना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती. तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारे हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झाले. येथे ठाणे ग्रामीण, पालघर आणि रायगड भागातून रुग्ण उपचारासाठी येत होते. पण, रुग्ण संख्या वाढू लागल्याने ते रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागले. यातूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातुन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ९०० खाटांचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला. ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या संबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयाने हा प्रस्ताव तयार केला होता. राज्य शासनाने त्यास मजुरी दिल्यानंतर रुग्णालय उभारणीचे काम सुरू झाले. रुग्णालय इमारत उभारणीचे काम वेगाने सुरू असतानाच, दुसरीकडे रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. त्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. ९०० खाटांचे सुपरस्पेशलिटी ठाणे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. यात ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करून महत्वाची सूचना केली होती. दरम्यान, रुग्णालयाचे बांधकाम आता पूर्ण झाले असून विद्युतीकरण, यंत्रसामुग्री बसविणण्याची कामे शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्य सुपरस्पेशलिटी रुग्णालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री बसविण्यात येणार असून याठिकाणी ८ मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. याठिकाणी स्वतंत्र विद्युतवहिनी जोडणी द्यावी लागणार आहे. ऐरोली येथून ही वहिनी भूमिगत पद्धतीने टाकावी लागणार आहे. विद्युतवहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय लोकार्पणासाठी तीन ते चार महिने लागतील, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

on 11 April
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
on 11 April
268e654f-9fc7-4356-938c-2c3dc6196971

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.
    1
    मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.
सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • #viral #collage #trend
    1
    #viral #collage #trend
    user_Its_Mangal_14_Official
    Its_Mangal_14_Official
    Actor Ulhasnagar, Thane•
    15 hrs ago
  • पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh
    1
    पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग 
फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper 
BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • 👉*भीख और मुफ्त भोजन के लिए मासूम का अपहरण* 👉*अमरोली की 4 साल की बच्ची अहमदाबाद से सुरक्षित बरामद* 👉*84 घंटे, 120 पुलिसकर्मी और एक मासूम की तलाश* *सूरत से अहमदाबाद तक हाई वोल्टेज ऑपरेशन* 👉*43 रेलवे स्टेशन और 1500 CCTV जांच के बाद आरोपी गिरफ्तार*
    1
    👉*भीख और मुफ्त भोजन के लिए मासूम का अपहरण*
👉*अमरोली की 4 साल की बच्ची अहमदाबाद से सुरक्षित बरामद*
👉*84 घंटे, 120 पुलिसकर्मी और एक मासूम की तलाश*
*सूरत से अहमदाबाद तक हाई वोल्टेज ऑपरेशन*
👉*43 रेलवे स्टेशन और 1500 CCTV जांच के बाद आरोपी गिरफ्तार*
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मनपा अधिकारी सवालों से भागे,ईद मंडी पर सस्पेंस! || Islamuddin Khan
    1
    मनपा अधिकारी सवालों से भागे,ईद मंडी पर सस्पेंस! || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.