कर्जतच्या नागेश्वर मंदिरात चोरट्याचा डाव उधळला; धाडसी चोरी करणारा तरुण ताब्यात! कर्जत शहरातील असलेल्या प्रसिद्ध नागेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरातील पितळी नागाची फणी व पितळी मूर्ती चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अमोल छगन समुद्र (वय २३, रा. समुद्रमळा, कर्जत, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे... याप्रकरणी उदयकुमार पोपटालाल बलदोटा (वय ६१, रा. बाजारतळ, कर्जत) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६२ व ३०५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कर्जत शहरामध्ये देशमुखवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नागेश्वर मंदिराचे पुजारी राजेंद्र पंडित खराडे हे सुमारे ४० वर्षांपासून मंदिरात पूजा-अर्चा करतात. नेहमीप्रमाणे त्यांनी मंदिराचे दरवाजे कुलूप लावून बंद केले होते. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११.५० वाजता फिर्यादी घरी असताना संतोष लक्ष्मण शिंदे यांनी त्यांना फोन करून नागेश्वर मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. तसेच मंदिरात जाऊन पाहिले असता नागेश्वराच्या नागाची पितळी फणी मंदिरात नसल्याचे आणि पितळी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणून ठेवलेली असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच फिर्यादींसह तात्या काशीनाथ क्षीरसागर, संभाजी गजानन क्षीरसागर, विशाल बलदोटा, व ओंकार शेलार आदींनी मंदिराकडे धाव घेतली. मंदिरात पाहणी केली असता पितळी नागाची फणी दिसून आली नाही. मात्र, मंदिराच्या मोठ्या घाब्यात आणून ठेवलेली पितळी मूर्ती दिसली. त्याचवेळी मंदिराच्या आसपास एक इसम लपून बसलेला आढळून आला. त्याच्यावर संशय बळावल्याने तात्या क्षीरसागर यांनी कर्जत पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल छगन समुद्र असे सांगितले. त्यानंतर मंदिराबाहेर ठेवलेली नागाची पितळी फणी त्याने पोलिसांना दाखवून दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांच्या चौकशीत मंदिरातील पितळी फणी व पितळी मूर्ती चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून अमोल समुद्र याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्जत शहरातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरातच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Sharad Inamdarगंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र🤝6 hrs ago
- बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर1
- Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा1
- SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप1
- केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.1
- "दहा बाय दहाच्या खोलीमध्ये पंधरा-पंधरा लोक राहतात, कधी कधी...!"1
- नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ1
- पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...1
- राज्यात 13 हजार नवे शिक्षक, कोणत्या शाळांमध्ये किती पदभरती? Maharashtra Teacher recruitment राज्याला आता 13 हजार नवे शिक्षक मिळालेत... पवित्र प्रणालीद्वारे राबवलेल्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना 13 हजार 119 उमेदवारांची निवड करण्यात आलीय... यात सर्वाधिक 8 हजार 481 उमेदवार हे जिल्हा परिषद शाळांसाठी निवडलेत... कागदपत्र पडताळणीनंतर या सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेतलं जाणार आहे... Maharashtra is set to get 13,000 new teachers, with the highest number of 8,481 appointments expected in Zilla Parishad schools. The recruitment drive is aimed at strengthening the teaching workforce and addressing vacancies across schools in the state. The development is significant for teacher recruitment aspirants and the education sector in Maharashtra. Maharashtra teacher recruitment, Maharashtra teacher vacancy, 13000 teacher recruitment, 8481 Zilla Parishad teachers, ZP teacher recruitment, Maharashtra teacher jobs, teacher recruitment 2026, Maharashtra education news, government teacher jobs, teacher vacancy Maharashtra, Zilla Parishad teacher recruitment, Maharashtra teacher bharti, teacher bharti latest news, education department Maharashtra, teaching jobs Maharashtra, government jobs Maharashtra, teacher recruitment update, Maharashtra latest news, Shuru news today's.1
- शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1