चाकूर पोलिसांची खून प्रकरणात मोठी कामगिरी. चाकूर येथील अल्पवयीन मुले हरवल्याचा बनाव करून एका मुलाचा खून केलेल्या प्रकरणाचा उलगडा – महिला आरोपी अटकेत. चाकूर पोलिसांची खून प्रकरणात मोठी कामगिरी. चाकूर येथील अल्पवयीन मुले हरवल्याचा बनाव करून एका मुलाचा खून केलेल्या प्रकरणाचा उलगडा – महिला आरोपी अटकेत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवली होती. अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाच्या या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत शास्त्रीय, तांत्रिक व अत्यंत सूक्ष्म तपासाच्या आधारे यशस्वी उलगडा करून आरोपीस अटक केली आहे. सदर संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून तत्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण तपासयंत्रणा कार्यान्वित करून सदर गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 01.00 वाजता फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी त्यांचा सात वर्षीय मुलगा देवांश व त्याचा चुलत भाऊ साईचरण हे सकाळी 07.00 वाजता घराबाहेर खेळण्यासाठी गेल्यानंतर परत न आल्याची माहिती चाकूर पोलीस ठाण्यास दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून सकाळी सुमारे 07:07 वाजता देवांश यास त्याचा चुलत भाऊ साईचरण उर्फ स्वयंम हा सायकलवर जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा तपासातील अत्यंत महत्त्वाचा धागा ठरला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांची सखोल चौकशी सुरू केली व घटनाक्रमाची साखळी उलगडण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून चाकूर शहर व परिसरात शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान दुपारी अंदाजे 01:30 वाजता उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ, ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश याचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. व घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट टीम यांना पाचारण करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास संदर्भात सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांची एकूण पाच स्वतंत्र पथके तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले व प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास, संशयितांचा मागोवा, गोपनीय बातमीदारांद्वारे माहिती संकलन तसेच कुटुंबीय व साक्षीदारांची चौकशी अशा सर्व अंगांनी तपास अत्यंत वेगाने व समन्वयाने पुढे नेण्यात आला. तपासादरम्यान कुटुंबातील पार्श्वभूमी, परस्पर संबंध, पूर्वीचे वाद तसेच संशयितांच्या हालचालींचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करता फिर्यादी यांची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे, काही काळ ती घराबाहेर असणे व चौकशीदरम्यान विसंगत माहिती देणे या बाबींमुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करत परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक माहिती यांची सांगड घातली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, गुन्ह्यातील आरोपी अनिता स्वामी हिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून अनिता व त्याच्या पतीमध्ये नेहमी वाद व भांडण तक्रारी होत होत्या. त्यामुळे स्वतःच्या आणि दिराच्या मुलाचे अपहरणाचा बनाव करून दिराच्या मुलाचा खून करून त्याचा आरोप पती सोबत अनैतिक संबंध असलेल्या महिले वर टाकून तिला अडकवण्यासाठी सदरचा कट रचून अनिताने निर्दोष बालकाचा खून केला व गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने त्याचे मृतदेह बाजूच्या पडक्या वाड्यामध्ये टाकून दिले. सदर प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 0196/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 238 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत समन्वयाने व कौशल्याने कामगिरी बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर करत अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटक करण्यात यश मिळाले. तसेच सदर खून प्रकरणात आणखीन कोणी सहभागी आहे का? याचाही बारकाईने तपास करण्यात येत आहे.

- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- Post by Karan1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1