logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यात विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक; ३८.६० लाखांच्या मुद्देमालासह वाहने जप्त ​चंद्रपूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे नियम व शासकीय आदेश धाब्यावर बसवून विनापरवाना व तीव्र आवाजात डीजे वाजवणाऱ्यांवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. राजुरा, रामनगर आणि दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. ​१. राजुरा येथे १२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नवीन बस स्टॉपसमोर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी कारवाई केली. बोलेरो पिकअप (क्र. MH-34-BZ-5017) वाहनावर परवान्याशिवाय मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याची तयारी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी डीजे मालक व ऑपरेटर रवि सतीश एकनकर (वय २८, रा. बल्लारशा) आणि चालक सचिन इन्चुलाल सरोज (वय २२, रा. बल्लारशा) यांच्याविरोधात अप. क्र. ७३०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३८, १३६ अन्वये गुन्हा नोंदवून १२ लाख ६० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. ​२. रामनगर पोलिसांची कारवाई; १२.५० लाखांचे साहित्य हस्तगत रामनगर पोलिसांनी विनापरवाना व कर्णकर्कश आवाजात डीजे आणि उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स वापरणाऱ्यांवर कारवाई केली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून धाड टाकून पोलिसांनी १ ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत ₹७,००,०००/-) आणि डीजे साऊंड सिस्टीमसह प्लाझ्मा साहित्य (किंमत ₹५,५०,०००/-) असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके व त्यांच्या पथकाने पार पाडली. ​३. दुर्गापूर येथे १२३.०५ डेसिबल आवाजात डीजे वाजवणाऱ्यावर गुन्हा; १३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडी (उर्जानगर नेरी, वार्ड क्र. ६) येथे गणेशोत्सव आगमनादरम्यान क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल १२३.०५ डेसिबल तीव्रतेने डीजे वाजवणाऱ्या अमन गंगाधर गोहणे (रा. बाबराळा, ता. मूळ) याच्यावर गुन्हा (अप क्र. ३९५/२०२६) दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून महिंद्रा सुप्रो वाहन (क्र. MH 34 CQ 3494), डी.जे. साहित्य, एम्प्लिफायर, जनरेटर व स्पीकर असा १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयूष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शेगावकर, पोउपनि पंकज वासाडे, पोहवा भोयर व पोशि तलांडे यांनी केली. ​सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि विनापरवाना डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

3 hrs ago
user_Disha News
Disha News
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
e063d276-4f7c-4ee7-b657-701bf9c1a94f

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    1
    सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली 
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    1
    गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर
ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न
भिवापूर (shuru ॲप )
नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे.
सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के  घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली )   अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी  आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    1
    डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई 
डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त,
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    1
    दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh 
[14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं?
नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं।
[14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    1
    Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    1
    चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती 
गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.
    1
    जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग
जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग
पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    1
    17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती
पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे
अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला
भिवापूर (shuru ॲप )
नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे.
सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के  घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली )   अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी  आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.