महाशिवरात्रीनिमित्त कुलस्वामिनी जय यमाई माता भक्त परिवारातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न ११ फूट उंच डिजिटल शंकर प्रतिमेचे अनावरण; महाप्रसाद व महाआरतीला भाविकांचा मोठा प्रतिसाद येवला येथील कुलस्वामिनी जय यमाई माता सेवा भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान शंकराची ११ फूट उंच भव्य डिजिटल प्रतिमा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकराच्या या भव्य डिजिटल प्रतिमेच्या अनावरणाने झाली. गणेश खैरे, अंकुश खैरे, राकेश खैरे आणि मुन्ना भावसार यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राम तुपसाखरे व सौ. सुरेशा तुपसाखरे तसेच प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, प्रा. दत्तात्रय नागडेकर, अंबादास पवार, रावजी पाबळे, जितु गुप्ता, सोमनाथ शिंदे, अक्षय लग्गड, गोरख बिलवरे, राम कोळगे, दत्तात्रय लचके, अशोक टिभे, दत्तात्रय लगड, भूषण शिंदे, सचिन गायकवाड आणि संतोष जेजुरकर या मान्यवरांच्या हस्ते भगवान शंकराची महापूजा व महाआरती करण्यात आली. उत्सवानिमित्त बुरूड गल्ली कॉर्नर येथे भव्य भगवा ध्वज फडकवण्यात आला होता. भक्तिमय वातावरणात भगवान शंकराच्या गाण्यांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त उपस्थित भाविकांना ८० किलो उपवासाचा चिवडा आणि १५१ पाकीट राजगिरा लाडू अशा महाप्रसादाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 'हर हर महादेव' आणि 'यमाई माता की जय' अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी सोमनाथ हाबडे, विशाल काळे, रामविलास कचोलीया, प्रवीण गांगुर्डे, मधुकर सरोदे, नारायण मामा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मुकेश लचके, गोकुळ गांगुर्डे, नितीन सयाम, दीपक बोराळे, कवित माळवे, अमोल लचके, राहुल सुताने, सुनील नागरे, पवन जेजुरकर, वरद लचके, श्रद्धा तुपसाखरे, शीतल तुपसाखरे, माधुरी लचके, भारती खैरे, सपना खैरे व सर्व सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- Post by VK ONLINE INFORMATION1
- 💪1
- Post by Dilip Patil1
- Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar1
- Post by दैनिक,"निळे प्रतीक"1
- अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.1
- सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...1