logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मिसिंग लिंक' आता 'कनेक्टिंग लिंक' : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा 'मिसिंग लिंक' आता 'कनेक्टिंग लिंक' : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असून, या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता याला 'मिसिंग लिंक' म्हणण्यापेक्षा 'कनेक्टिंग लिंक' म्हटले पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झाला आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीने व प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. 'मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत हा बोगदा साकारण्यात आला असून, यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यात अद्ययावत अग्निशामन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर दोन बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आणि लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या लिंकमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून मोठा दंड आकारला जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याच प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात उंच महामार्ग केबल-स्टेड पुलाची निर्मितीही करण्यात आली असून, 182 मीटर उंचीचा हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. या पुलाच्या डिझाइनसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला असून, विंड टनेल मॉडेलिंगच्या आधारे त्याची आखणी करण्यात आली आहे. ही 'मिसिंग लिंक' इकोनॉमिक मल्टिप्लायर म्हणून पुढे येईल आणि यामुळे ₹70,000 कोटींपेक्षा अधिकची अर्थव्यवस्था तयार होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची इंधन बचत होणार असून नागरिकांचा वेळ देखील वाचणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. एमएसआरडीसीच्या टीमने व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उत्तम काम केले असून, ज्या कामगारांच्या श्रमामुळे ही 'मिसिंग लिंक' आज आपल्याला उदघाटित करता आली, अशा सर्व कामगारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

3 hrs ago
user_अरबाज शेख.सावरगाव कर
अरबाज शेख.सावरगाव कर
Voice of people उंबेरखेडा तांडा•
3 hrs ago
2fd6eda1-d53b-4b1e-89b4-c866e5cd8f56

मिसिंग लिंक' आता 'कनेक्टिंग लिंक' : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा 'मिसिंग लिंक' आता 'कनेक्टिंग लिंक' : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असून, या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता याला 'मिसिंग लिंक' म्हणण्यापेक्षा 'कनेक्टिंग लिंक' म्हटले पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झाला आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीने व प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद

3668e1da-d82b-4fd9-b353-0f4977aa70c3

केले. 'मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत हा बोगदा साकारण्यात आला असून, यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यात अद्ययावत अग्निशामन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर दोन बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आणि लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या लिंकमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून मोठा दंड आकारला जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याच प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात उंच महामार्ग केबल-स्टेड पुलाची निर्मितीही करण्यात आली असून, 182 मीटर उंचीचा हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना

44eac29c-afde-4c32-8620-9b6f185bb156

ठरला आहे. या पुलाच्या डिझाइनसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला असून, विंड टनेल मॉडेलिंगच्या आधारे त्याची आखणी करण्यात आली आहे. ही 'मिसिंग लिंक' इकोनॉमिक मल्टिप्लायर म्हणून पुढे येईल आणि यामुळे ₹70,000 कोटींपेक्षा अधिकची अर्थव्यवस्था तयार होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची इंधन बचत होणार असून नागरिकांचा वेळ देखील वाचणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. एमएसआरडीसीच्या टीमने व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उत्तम काम केले असून, ज्या कामगारांच्या श्रमामुळे ही 'मिसिंग लिंक' आज आपल्याला उदघाटित करता आली, अशा सर्व कामगारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

More news from उंबेरखेडा तांडा and nearby areas
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    7 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००
    1
    *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात*
*सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट*
छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. 
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. 
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. 	त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.  सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.  आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री  शिरसाट यांनी केले. 
*जनगणनेत सहभागाचे आवाहन*
देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले.
*पुरस्कार वितरण*
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.
सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी  कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. 
०००००
    user_Global bharat
    Global bharat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    1
    सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Electrician सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.