उमरखेड तालुक्यातील अवैध रेती उपसा व विक्रीमुळे बंद झालेले रेती घाट पुन्हा सुरू होण्याची शक्यता? पुन्हा चालणार एकाच रॉयल्टीवर ४ ते ५ ट्रिपांचा अवैध रेती प्रवास? आमदारांची मेहरबानी कि एस डी ओ तहसीलदार मेहरबान? या फिर कोई बडे नेता का हाथ?घरकुल धारकांचे काय होणार? तालुक्यातील व शहरातील ठिकठिकाणचे अवैधरेतीसाठी कोण जप्त करणार? महसूल व पोलीस तथा गौण खनिज विभागांचे हाथ वर? की हाथ ओले? *उमरखेड तालुक्यात ब्राह्मणगाव चातारी दिघडी बोरी, तिवडी, टाकळी, मारलेगाव, निमगव्हाण, संगमचिंचोली , व उमरखेड शहरात ठीक ठिकाणी अवैध रेतीसाठे असून बोरबन किंवा काही भागात पटवाऱ्याच्या घरापासून हाकेच्या अंतरावर अवैध रेती साठा असल्याचे नागरिकात उघड बोलल्या जात आहे परंतु सदर पटवाऱ्याचे दुर्लक्ष का होत आहे? काही लोक घर बांधण्यासाठी रेती घेतात परंतु अवैध रेती माफिया त्यांना रॉयल्टी ची कॉपी देत नाहीत हे विशेष परंतु सदर पटवारी मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत असेही समजतेमहसूल प्रशासनाचे खरच दुर्लक्ष आहे की अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे? हे नागरिकांना समजायला मार्ग नाही पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा अनेक घाटावरून सुरू आहे अवैध रेती उपसा व अवैध रेती विक्रीवर धाड मारणारे पथक आज बहुदा अस्तित्वात नाही तर उमरखेड शहरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे निरर्थक ठरले आहेत अधिकृत घाट हरास केल्यानंतरही रॉयल्टीच्या नव्या फंड्याने महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ फेकून एकाच रॉयल्टीवर ४ते ५ रेतीच्या ट्रिप्स खुले आम नेल्या जातात धाड पडू नये म्हणून शहरातील ठिकठिकाणी व शहराबाहेरील अनेक ठिकाणी रेतीमाफीयांनी त्यांचे खबरे तैनातकेले आहेत उदाहरणार्थ तिवडी टाकळी किंवा दिघडी वगैरे रेती घाटावरून निघणारा रेतीचा टिप्पर रॉयल्टी घेऊन निघतो त्या रॉयल्टीवर उमरखेड ते नांदेड किंवा उमरखेड ते वाशिम अथवा उमरखेड ते आरनी किंवा इतर दूरच्या शहराचे नाव असते खरंच ते त्या ठिकाणी जात आहेत का याची तपासणी महसूल विभाग किंवा पोलीस करीत नाहीएवढेच नव्हे तर गंमत अशी आहे की उमरखेड कोणते? उमरखेड तालुका कोणता? त्याचा जिल्हा कोणता? नांदेड अकोला की यवतमाळ? हे तहसीलदार एसडिओ व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हे तपासत का नाही? गौण खनिज अधिकाऱ्यांची ही विशेष मेहरबानी उमरखेडर वर दिसत आहे पोलीस देखील अवैध रेती वाहतूक तपासत नाही पोलिसांच्याही नियमात नसलेल्या अनेक गोष्टी ह्या वाहनात होत असतात रेतीची वाहतूक करणारे जवळपास वाहने नियमबाह्यपणे वाहतूक करीत असतात शहरातील पोलीस व ट्रॅफिक पोलीस दुर्लक्ष का करते? एरवी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मिरवणारे अधिकारी ह्याकडे पाठ का फिरवतात? रेतीच्या धंद्याच्या विरोधात जास्त बातम्या आल्यानंतर किंवा तक्रारी आल्यानंतर एखाद्या वेळेला महामहीम एस डी ओ व तहसीलदार रेतीवर धाड मारायला जातात त्याची खबर, खबरे रेतीमाफीयांना देतात रेती माफियांचे खबरे कोण आहेत? हे महसूल विभागाला माहित आहे महसूल विभागातील कार्यालयातील काही कर्मचारी साहेबांच्या गाडीची माहिती त्या खबऱ्यापर्यंत पोहोचवीत असतात अशी धकाधक माहिती आहे म्हणजे "कुंपणच शेत खात आहे"काहीसा असा प्रकार आहे रेती माफियांच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अर्थ पुरवठा केल्या जात आहे त्याचे नेटवर्क करण्यासाठी महागाव वरून एका होम तहसीलच्या बाबुला डेप्युटेशनवर आणले आहे बाबुला डेपुटेशनवर आणण्याचे कारण काय?होम तहसीलवर कर्मचाऱ्यांना आणता येते का? सदर बाबुला होम तहसीलच्या ठिकाणी डेपुटेशनवर नियम बाह्यपणे आणण्याचे कारण काय? जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सदरबाबूची तातडीने पुन्हा महागाव येथे बदली करायला पाहिजे जिल्हाधिकारी बदलीची कारवाई करतील का?असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाले आहे परंतु त्या बाबुला राजकीय व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आश्रय असल्यामुळे हे सर्व बिंदासपणे चालू आहे वृत्तपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियावर सोशल मीडियातून लगातार बातम्या आल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाने हर्रास झालेले रेती घाट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे आज किंवा लवकरच हे घाट पुन्हा सुरू होणार आहेत त्यामुळे पुन्हा हा एकाच रॉयल्टीवर ४ते५ ट्रिप्स मारण्याचा अवैध रेती वाहतुकीच्या धंदा जोरात चालणार आहे एरवी तो चालू आहेत फक्त कागदोपत्री तात्पुरते बंद आहेत* *महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुल धारकांना मोफत वाळू पुरवण्याचे धोरण जाहीर केले आहे परंतु त्यांच्याच पक्षातील काही बडे नेते आपल्या कार्यकर्त्यांना व स्वतःला वेलडेव्हलप करण्यासाठी आपल्या पक्षाचे नेते महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धोरणाला पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे हे उघड्या डोळ्यांनी बघूनही महामहीम आमदार मौन आहेत कारण रेतीच्या धंद्यात सत्ताधारीची माणसं जास्त प्रमाणात दिसत आहे विरोधकांची ही माणसंआहेत त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते ह्या रेतीच्या अवैध धंद्याला विरोध करीत नाही त्यामुळे घरकुलधारकांना मोफत रेती मिळत नसल्याची ओरड होत आहे जिल्हा गौण खनिज अधिकारी व माननीय जिल्हाधिकारी तथा माननीय पोलीस अधीक्षक यांनी उमरखेडच्या तुफान अवैध रेती व्यवसायाला गवसणी घालावी!

- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- Post by वैजनाथ पावडे1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- Post by Mohammad Rafikh1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- 30 लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त, प्रशासनाची धडक कारवाई1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1