Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:निदा खानच्या अटकपूर्व जामीनावर 27 एप्रिलला निर्णय; सुनावणीत जोरदार युक्तिवाद नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुमारे तासभर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 27 एप्रिलला ठेवली आहे. निदा खान सध्या फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. तिच्या वकिलांनी अंतरिम जामीनाची मागणी केली असली तरी न्यायालयाने कोणतेही संरक्षण दिलेले नाही. त्यामुळे पोलिसांना अटक करण्यास मुभा आहे. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kapil Katyare
नाशिक:निदा खानच्या अटकपूर्व जामीनावर 27 एप्रिलला निर्णय; सुनावणीत जोरदार युक्तिवाद नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुमारे तासभर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 27 एप्रिलला ठेवली आहे. निदा खान सध्या फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. तिच्या वकिलांनी अंतरिम जामीनाची मागणी केली असली तरी न्यायालयाने कोणतेही संरक्षण दिलेले नाही. त्यामुळे पोलिसांना अटक करण्यास मुभा आहे. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक: दिंडोरी-निफाड येथे खासदार भास्कर भगरे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकारवर टीका केली. २०२३ मध्ये मंजूर झालेला ‘नारीशक्ती वंदन’ कायदा अद्याप लागू न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध असल्याचा आरोप त्यांनी फेटाळत, “आमचा कधीच विरोध नव्हता; केंद्राने तातडीने कायदा लागू करावा, आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. जनगणना व मतदारसंघ फेररचनेशी अंमलबजावणी जोडून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.1
- 👉में निधि कुमारी ; हम अपने होश हवास में बोल रही हूँ की मेरे गार्जियन मेरे मर्जी बगैर कही और एक उम्रदराज लड़का के साथ शादी करवा रही थी जिसके वजह से हम अपने मर्जी से घर से निकल कर इस लड़का के साथ खुशहाल शादी कर लिए है और हम जहां भी है इसके साथ खुश है और इसके बारे में हम अपने गार्जियन को कुछ दिन पहले जानकारी भी दिए थे अगर इस लड़का को या इसके परिवार को किसी भी प्रकार के दबाव दिया जाता है तो इसका जिम्मेवार मेरे परिवार और इसमें शामिल मेरे रिश्तेदार होगे !!1
- लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती. ४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं. Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं. विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते. अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.1
- Post by Changdev Barge1
- येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला1
- Post by AQUEEL CABLE NETWORK1
- 🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 📍 सुरत (गुजरात) रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली. 🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. 😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. ⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS1
- पटना में सोने की बड़ी लूट! बिहार में मुख्यमंत्री बनते ही अपराधियों की मौज! अब नए नवेले मुख्यमंत्री जुबान से ही अपराध खत्म कर देंगे या फिर अपराधियों को खोजने से पूर्व उनकी जाति ढूंढेंगे, तदनुसार प्रतिकूल और अनुकूल बयान जारी किया जाएगा।1