सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दि.१३ सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, दि.१५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत वाहतूक नियमावलीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गावरील झालटा फाटा ते एस.आर.पी.एफ. (SRPF) कॅम्प आणि पुन्हा त्याच मार्गे झालटा फाटा पर्यंत (१० कि.मी.) सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज पहाटे ५.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत. झालटा फाटा ते SRPF कॅम्प दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहतूक कोंडी किंवा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने बीडकडून छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळेकडे जाणारी वाहतूक ही हॉटेल पालखी जवळून धुळे येथून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून ये-जा करण्यासाठी उपलब्ध असेल. सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांच्या सायकली आणि वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ,नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता वाहनधारकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डॉ. विनयकुमार राठोड ,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

- छत्रपती संभाजी नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून जयंती साजरी केली1
- Md Tayyab Zafar Best Speech ॥ Eid Milan Program ॥ Organized by Vanchit Bahujan Aghadi1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- 180 लड़कियां, 350 अश्लील वीडियो... 19 साल का मास्टरमाइंड अयान अहमद कौन है? महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया है, जहां एक 19 वर्षीय युवक पर नाबालिग लड़कियों का यौन शोषण करने और उनके वीडियो बनाकर ब्लैकमेल करने का आरोप है। इस मामले ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है और लोगों में भारी गुस्सा देखा जा रहा है। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच तेज कर दी गई है। पुलिस के अनुसार, आरोपी की पहचान अयान अहमद तनवीर अहमद के रूप में हुई है, जिसे मंगलवार को गिरफ्तार किया गया और 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजा गया है।1
- Post by अरबाज शेख1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1