जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका तसेच जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा गडचिरोलीत कंकडालवार यांनी घेतली आमदार वडेट्टीवार यांची भेट..! दोघांमध्ये झाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह विविध समस्यांवर चर्चा..! गडचिरोली : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची गडचिरोली दौऱ्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव अजयभाऊ कंकडालवार यांनी त्यांची रानफुल निवास्थानी भेट घेऊन जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका तसेच जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा केली. काल आमदार वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे आगमना नंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील व जिल्ह्यातील समस्यांवर पत्रकारांशी संवाद साधले. या पत्रकार परिषदेत त्यांनी चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील जमीन अधिग्रहण बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली होती. यानंतर दोन्ही नेत्यांनी शेतकरी शिष्टमंडळाशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.दुपारी त्यांनी स्व. मानकल्लोजी असाटी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. त्यानंतर ‘जनफुल निवास’ येथे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक आढावा घेतला.दुपारनंतर गडचिरोलीवरून नागभीडकडे प्रस्थान करून सायंकाळी नागभीड येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून,परिसरात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विविध ठिकाणी नागरिकांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या. रात्री नागपूर येथे परतल्यानंतर दौऱ्याची सांगता झाली. एकूणच, शेतकरी प्रश्न, संघटन बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांशी संवाद यावर केंद्रित असलेला हा दौरा गडचिरोली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1