८६ वर्षीय अनुसयाबाई साळुबा वाडेकर यांची जिद्द ठरली प्रेरणादायी; नवभारत साक्षरता अभियानात यशस्वी वाटचाल : फुलंब्री तालुक्यातील मारसावळी गावात नवभारत साक्षरता अभियानाला प्रेरणादायी दिशा मिळाली असून, ८६ वर्षीय अनुसयाबाई साळुबा वाडेकर यांनी जिद्दीच्या जोरावर साक्षरतेकडे यशस्वी वाटचाल करत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अनुसयाबाई यांना सुरुवातीला अक्षरओळख नव्हती व त्या अंगठा देऊन काम भागवत असत. मात्र शिक्षणाची तीव्र इच्छा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी अक्षरज्ञान मिळवले. मारसावळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भास्कर पोपटराव गोंगे तसेच पठाण सर, रामटेके सर आणि सय्यद सर यांनी त्यांना विशेष मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आडवी रेषा, उभी रेषा, उजळणी यांसारख्या प्राथमिक गोष्टींपासून शिक्षणाची सुरुवात करून दिली. जुन्या पाटीवर सराव करून घेत, वही व पुस्तके देऊन नियमित अभ्यास घडवून आणला. प्रथम अक्षर व मुळ अवयव शिकवून त्यांची भक्कम पायाभरणी करण्यात आली. शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास शिक्षकांनी त्यांना अतिरिक्त वेळ देऊन शिकवले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनुसयाबाई आता अंगठ्याऐवजी स्वतःची सही करू लागल्या आहेत. वृद्धांच्या हाती पेन आणि पाटी पाहायला मिळणे ही या उपक्रमाची खास बाब ठरली. ही परीक्षा निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर आणि विस्तार अधिकारी राजेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख सुनील चिपाटे यांनी धामणगाव केंद्रातील शाळांना भेट देऊन परीक्षेची पाहणी केली, तर तालुका समन्वयक बी. टी. साळुंके यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत घेतलेल्या परीक्षेत अनुसयाबाई यांनी यश मिळवले असून, आता त्यांना पुढेही शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- एकाचवेळी ९ जनावर अंत्यसंस्कार भयानक दृश्य मृतदेह कोणता कुणाचा??? नाशिकची घटना मन हेलावून टाकणारी आहे.. दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनासाठी आलेल्या दरगोडे कुटुंबातील 9 सदस्य असलेली कार कडे नसलेल्या विहिरीत कोसळली.. सर्वच्या सर्व सदस्यांचा या अपघातात बळी गेला. त्या विहिरीला मजबूत कडे नसल्याने ती विहिर चालकाच्या लक्षातच आलेली नव्हती.. वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागण्याच्या वेळी ऐन वळणावर असलेल्या या विहिरीने 9 जणांचा अकस्मात बळी घेतला. अंत्यविधी वेळी कोणता मृतदेह कुणाचा? हे देखील गावकऱ्यांना कळत नव्हते.मानवी इतिहासात ह्या घटना मनाला हादरवून जाणाऱ्या आहेत.1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1