रायगड जिल्ह्यातील मुंबई–गोवा महामार्गावर बुर्डी बसस्टॉपसमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दोघांनाही डोक्यासह हात-पायांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्डी गावाच्या हद्दीत बुर्डी बसस्टॉपसमोर गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. सालींदे येथील पोलीस पाटील सुनील शंकर पाटील (वय ५१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अपघातात प्रदीप कुमार साहब सिंग (वय ३३) आणि अजय कुमार रामप्रकाश (वय ३१) या दोघा परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला. ते सध्या पेण तालुक्यातील सालींदे येथील एल अँड टी कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, लाल रंगाची ब्रेझा कार (क्रमांक MH-06-BU-4664) अति वेगाने आणि बेदरकारपणे चालवत असताना चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या या दोघांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून कारसह पळ काढल्याचेही उघड झाले आहे. या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1), 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सोनवळे करीत असून आरोपी कारचालकाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- दूरदर्शन की पुरानी यादें 😮💨😔😥1
- समाजवादी पार्टी के नेता अखिलेश यादव ने बढ़ती महंगाई और गैस सिलेंडर की कीमतों को लेकर सरकार पर बड़ा हमला बोला। उन्होंने कहा कि अब सरकार की जिम्मेदारी बनती है कि सिलेंडर कैसे भरे जाएंगे। अगर चीजें इतनी महंगी हो जाएंगी तो आम आदमी के हाथ से निकल जाएंगी। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अगर ऐसा ही दो हफ्ते और चला तो लोगों को लकड़ी का इंतजाम करना पड़ेगा। Akhilesh Yadav’s sharp reaction on rising inflation and LPG gas cylinder prices is now making headlines. Watch this short news update. Police Vision Times1
- Post by Lokhit Hindi1
- गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न1
- नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai1
- Post by Nirbhay Nagri1
- Post by RNN CHANNEL1
- Post by Lokhit Hindi1