logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*जलशुद्धीकरण केंद्राजवळ कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रास भाजपचा तीव्र विरोध* आष्टी : आष्टी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ प्रस्तावित करण्यात आलेल्या *जलशुद्धीकरण केंद्राजवळ कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रास भाजपचा तीव्र विरोध* आष्टी : आष्टी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ प्रस्तावित करण्यात आलेल्या कुत्र्यांच्या नसबंदी केंद्राला भारतीय जनता पार्टी, आष्टीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री गडलिंग यांना निवेदन देऊन सदर केंद्र अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ कुत्र्यांची ये-जा, मलमूत्र, केस तसेच नसबंदी प्रक्रियेतून निर्माण होणारा जैविक व संसर्गजन्य कचरा यामुळे परिसरातील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जलशुद्धीकरण केंद्र हे अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने अशा परिसरात नसबंदी केंद्र सुरू करणे योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. सदर नसबंदी केंद्र जलशुद्धीकरण केंद्रापासून किमान ५०० मीटर अंतरावर अथवा अन्य सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सुरू करण्यापूर्वी संबंधित आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि सक्षम प्राधिकरणांकडून आवश्यक तांत्रिक व आरोग्यविषयक अहवाल घेण्यात येवून मग निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक विजयकर, नगरसेवक ॲड मनिष ठोंबरे, उत्तम बरगे, नरेंद्र भनेरकर, विजय खांडेकर,अतुल गुल्हाने,सागर सिनकर, नजीम अली,नीरज भार्गव, अनिल डोईफोडे, आवेज खान, सौरभ तायडे, मंगेश शिरभाते, सचिन नासरे, साबीर शेख, शाकीर भाई उपस्थित होते.

2 hrs ago
user_राजेंद्र वामनराव खंडारे
राजेंद्र वामनराव खंडारे
आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago
ff82bbef-3b36-4aa6-951b-b18dddc11630

*जलशुद्धीकरण केंद्राजवळ कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रास भाजपचा तीव्र विरोध* आष्टी : आष्टी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ प्रस्तावित करण्यात आलेल्या *जलशुद्धीकरण केंद्राजवळ कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रास भाजपचा तीव्र विरोध* आष्टी : आष्टी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ प्रस्तावित करण्यात आलेल्या कुत्र्यांच्या नसबंदी केंद्राला भारतीय जनता पार्टी, आष्टीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री गडलिंग यांना निवेदन देऊन सदर केंद्र अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ कुत्र्यांची ये-जा, मलमूत्र, केस तसेच नसबंदी प्रक्रियेतून निर्माण होणारा जैविक व संसर्गजन्य कचरा यामुळे परिसरातील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जलशुद्धीकरण केंद्र हे अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने अशा परिसरात नसबंदी केंद्र सुरू करणे योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. सदर नसबंदी केंद्र जलशुद्धीकरण केंद्रापासून किमान ५०० मीटर अंतरावर अथवा अन्य सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सुरू करण्यापूर्वी संबंधित आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि सक्षम प्राधिकरणांकडून आवश्यक तांत्रिक व आरोग्यविषयक अहवाल घेण्यात येवून मग निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक विजयकर, नगरसेवक ॲड मनिष ठोंबरे, उत्तम बरगे, नरेंद्र भनेरकर, विजय खांडेकर,अतुल गुल्हाने,सागर सिनकर, नजीम अली,नीरज भार्गव, अनिल डोईफोडे, आवेज खान, सौरभ तायडे, मंगेश शिरभाते, सचिन नासरे, साबीर शेख, शाकीर भाई उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप
    1
    जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या गोविंद गवई यांना अखेर रात्री साडेअकरा वाजता सुखरूप खाली उतरवण्यात यश बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या गोविंद गवई यांना अखेर रात्री साडेअकरा वाजता सुखरूप खाली उतरवण्यात यश कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व कुटुंबीयांच्या अथक प्रयत्नांना यश प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या ४२ वर्षीय गोविंद गवई (रा. बडनेरा) यांनी अमर शहीद भगतसिंग चौक येथील बीएसएनएलच्या टॉवरवर चढल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री साडेअकराच्या सुमारास गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद गवई यांचा सुमारे बारा वर्षांपूर्वी धामणगांव रेल्वे तालुक्यातील दिघी महल्ले येथील एका युवतीसोबत विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून सुमारे सहा वर्षांपूर्वी धामणगांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात खावटीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी गोविंद गवई न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाच्या परिसरात त्यांचा मेव्हण्यासोबत वाद झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गवई यांनी थेट अमर शहीद भगतसिंग चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. ते टॉवरवर चढल्याचे समजताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधत खाली येण्याची विनंती केली; मात्र गवई हे खाली येण्यास तयार नव्हते. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीलाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अनेक नागरिकांनी तसेच कुटुंबीयांनी फोनवरून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची सासू, पत्नी व मेव्हणा यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून गवई यांना खाली येण्याची विनंती केली. अखेर गवई यांच्या बहिणीने फोनवरून त्यांच्याशी संवाद साधत भावाची समजूत काढली. बहिणीच्या आवाहनाला प्रतिसाद देत रात्री साडेअकराच्या सुमारास गोविंद गवई टॉवरवरून खाली उतरले. त्यानंतर दत्तापूर पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगांव रेल्वे येथे पाठविले. या घटनेमुळे धामणगांव शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये दिवसभर एकच चर्चा रंगली होती. पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कुटुंबीयांच्या संयमी प्रयत्नांमुळे अखेर गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
    1
    बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या गोविंद गवई यांना अखेर रात्री साडेअकरा वाजता सुखरूप खाली उतरवण्यात यश

बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या गोविंद गवई यांना अखेर रात्री साडेअकरा वाजता सुखरूप खाली उतरवण्यात यश
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व कुटुंबीयांच्या अथक प्रयत्नांना यश
प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे 
कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या ४२ वर्षीय गोविंद गवई (रा. बडनेरा) यांनी अमर शहीद भगतसिंग चौक येथील बीएसएनएलच्या टॉवरवर चढल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री साडेअकराच्या सुमारास गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद गवई यांचा सुमारे बारा वर्षांपूर्वी धामणगांव रेल्वे तालुक्यातील दिघी महल्ले येथील एका युवतीसोबत विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून सुमारे सहा वर्षांपूर्वी धामणगांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात खावटीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी गोविंद गवई न्यायालयात हजर झाले होते.
न्यायालयाच्या परिसरात त्यांचा मेव्हण्यासोबत वाद झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गवई यांनी थेट अमर शहीद भगतसिंग चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. ते टॉवरवर चढल्याचे समजताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधत खाली येण्याची विनंती केली; मात्र गवई हे खाली येण्यास तयार नव्हते.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीलाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अनेक नागरिकांनी तसेच कुटुंबीयांनी फोनवरून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची सासू, पत्नी व मेव्हणा यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून गवई यांना खाली येण्याची विनंती केली.
अखेर गवई यांच्या बहिणीने फोनवरून त्यांच्याशी संवाद साधत भावाची समजूत काढली. बहिणीच्या आवाहनाला प्रतिसाद देत रात्री साडेअकराच्या सुमारास गोविंद गवई टॉवरवरून खाली उतरले. त्यानंतर दत्तापूर पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगांव रेल्वे येथे पाठविले.
या घटनेमुळे धामणगांव शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये दिवसभर एकच चर्चा रंगली होती. पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कुटुंबीयांच्या संयमी प्रयत्नांमुळे अखेर गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    15 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Amravati, Maharashtra•
    2 hrs ago
  • ‎बच्चू भाऊ छोट्या बच्चूंना भेटतील की आरोग्यमंत्र्यांना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल ‎
    1
    ‎बच्चू भाऊ छोट्या बच्चूंना भेटतील की आरोग्यमंत्र्यांना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
‎
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न* *जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश* *अखिल आर्यवर्त संघ* *आंतरराष्ट्रीय बजरंग दल / आंतरराष्ट्रीय दुर्गाशक्ती परिषद* *विदर्भ प्रांत, बुलढाणा जिल्हा* *दिनांक: 25-08-2026, मंगळवार* --- *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न* *जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश* *बुलढाणा:* आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे *संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिनेश दादा पाटील जी* यांच्या मार्गदर्शनात आज विदर्भ प्रांतात संघटन विस्ताराचे कार्य जोमात सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 25-08-2026 रोजी *विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. श्री संतोष सिंह ठाकूर जी* यांच्या मार्गदर्शनात व *बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. श्री शुभम राजेश पाटमासे जी* यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा तालुक्यातील *पिंपळखुटा व परिसरातील गावांची* आंतरराष्ट्रीय बजरंग दल कार्यकारिणी विस्तार बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या पुढील कार्याची दिशा, हिंदुत्वाचे कार्य गावागावात पोहोचवणे आणि युवकांना धर्मकार्यात जोडणे यावर चर्चा करण्यात आली. *यावेळी उपस्थित वीर बजरंगी:* आदित्य टाले, सतिश शिवाजी दराडे, देवानंद आनंद जायभाये, समाधान सानप, अभिषेक ताठे, सतिश गुठे, ऋषिकेश काकड, हर्षल दराडे, नितीन घुगे, भगवान घुगे, गणेश दहीवाळ, शिवम घुगे, भागवत घुगे, ऋषिकेश घुगे, आदित्य घुगे, सुजीत ताठे, सिद्धेश्वर दराडे, स्वप्नील घुगे, संदीप ताठे, रघुनंदन ताठे, शिवानंद नागरे, गणेश ताठे, समाधान जायभाये, उमेश ताठे व अन्य असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा समारोप *।। जय श्रीराम ।।* च्या प्रचंड जयघोषाने झाला. *निवेदक:* *श्री शुभम राजेश पाटमासे* *जिल्हाध्यक्ष - बुलढाणा* *आंतरराष्ट्रीय बजरंग दल, विदर्भ प्रांत*
    1
    *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न*
*जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश*
*अखिल आर्यवर्त संघ*
*आंतरराष्ट्रीय बजरंग दल / आंतरराष्ट्रीय दुर्गाशक्ती परिषद*
*विदर्भ प्रांत, बुलढाणा जिल्हा*
*दिनांक: 25-08-2026, मंगळवार*
---
*सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न*
*जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश*
*बुलढाणा:* आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे *संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिनेश दादा पाटील जी* यांच्या मार्गदर्शनात आज विदर्भ प्रांतात संघटन विस्ताराचे कार्य जोमात सुरू आहे.
आज मंगळवार दिनांक 25-08-2026 रोजी *विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. श्री संतोष सिंह ठाकूर जी* यांच्या मार्गदर्शनात व *बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. श्री शुभम राजेश पाटमासे जी* यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा तालुक्यातील *पिंपळखुटा व परिसरातील गावांची* आंतरराष्ट्रीय बजरंग दल कार्यकारिणी विस्तार बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत संघटनेच्या पुढील कार्याची दिशा, हिंदुत्वाचे कार्य गावागावात पोहोचवणे आणि युवकांना धर्मकार्यात जोडणे यावर चर्चा करण्यात आली.
*यावेळी उपस्थित वीर बजरंगी:*
आदित्य टाले, सतिश शिवाजी दराडे, देवानंद आनंद जायभाये, समाधान सानप, अभिषेक ताठे, सतिश गुठे, ऋषिकेश काकड, हर्षल दराडे, नितीन घुगे, भगवान घुगे, गणेश दहीवाळ, शिवम घुगे, भागवत घुगे, ऋषिकेश घुगे, आदित्य घुगे, सुजीत ताठे, सिद्धेश्वर दराडे, स्वप्नील घुगे, संदीप ताठे, रघुनंदन ताठे, शिवानंद नागरे, गणेश ताठे, समाधान जायभाये, उमेश ताठे व अन्य असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप *।। जय श्रीराम ।।* च्या प्रचंड जयघोषाने झाला.
*निवेदक:*
*श्री शुभम राजेश पाटमासे*
*जिल्हाध्यक्ष - बुलढाणा*
*आंतरराष्ट्रीय बजरंग दल, विदर्भ प्रांत*
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज नेटवर्क अलिबाग: सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
    1
    जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि  अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खानाव  येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    3
    सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ
सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ
नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    user_देवराव प्रधान (पत्रकार)
    देवराव प्रधान (पत्रकार)
    Photographer नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Amravati, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.