वाहतूक पोलीस विभागतर्फे संपूर्ण वर्धा जिल्हयात विशेष उपाययोजना वर्धा न्यूज़ वर्धा जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करीता मा पोलीस अधिक्षक, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपूर्ण वर्धा जिल्हयात विशेष उपाययोजना राबविण्यात येत असुन वर्धा जिल्हयामध्ये वाढत असलेले अपघात, त्यावर प्रतिबंध घालण्याकरीता व वाहतूकीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करिता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यास सुरवात केलेली आहे जनजागृती आणि शिक्षण शाळा व महाविद्यालयांना भेटी पोलीस काका दिदी उपक्रम १. वर्धा जिल्हयातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये रस्ता सुरक्षा व हेल्मेट वापरणे महत्वाचे आहे बाबत सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. २. एन.एस.एस. चे विद्याथर्थी मदतीला घेवुन पथनाट्ये सादर करण्यास सुरवात केलेली आहे.. बाबा १. पालक पोलीसांचे ऐकतीलच असे नाही पण आपल्या मुलांचे नक्कीच ऐकतात करीता प्राथमिक शाळेच्या मुलांना त्यांच्या पालकांसाठी माझ्यासाठी हेल्मेट वापरा असे पत्र लिहण्याची स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. क्रिएटीव्ह पोस्टरचा वापर डोकं भिजु नये म्हणून छत्री हवी, मग डोकं फुटू नये म्हणून हेल्मेट का नको अशा स्थानिक बोली भाषेतील संदेशांचे पोस्टर्स तयार करून शहराचे मुख्य चौकाचौकांमध्ये लावण्यास सुरवात केलेली आहे. २) कल्पक आणि सकारात्मक अंमलबजावणी गांधीगिरी १. यमराज संकल्पना केवळ दंड करण्यापेक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यास सुरवात केलेली आहे. बक्षीस योजना २. शहरातील रिल्सस्टार यांचेशी संपर्क करुन वाहतूक नियमांच्या संबंधीत रिल्स तयार करून प्रसारीत करण्यास सुरवात केलेली आहे सुरक्षा स्टिकर्स १. जे वाहन चालक बाहतूक नियमांचे पालन करतात त्यांचा फुले पुष्पगुच्छ देवून गौरव करणे व त्यांचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करुन इतर वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यास सुरवात केलेली आहे. वारंवार अपघात होणा-या ठिकाणी रेडीयम स्टिकर्स चिपकावणे तसेच बंद स्थितीत असलेल्या रस्त्यांवरील वाहनांना हिरव्या, लाल रंगाचे स्टिकर्स लावण्यास सुरवात केलेली आहे. सोशल मिडीया वाहतूक नियमांचे पोस्टर्स, रिल्स तयार करुन प्रसारित करण्यास व प्रसिद्धी करण्यास सुरवात केलेली आहे. हेल्मेट वाटप हेल्मेट वापराबाबत जनजागृती करुन मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम राबविणार असून, हेल्मेट सक्ती करण्यास भर देण्यात येत आहे. ३) जनता व वाहतूक युनियन सोबत समन्वय :- रिक्षा आणि टॅक्सी १. रिक्षाचालकांना वाहतुकीचे बॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून विश्वासात घेवून नो पाकोंग युनियन व सुरक्षीत वाहतूकी बाबत मार्गदर्शन करण्यास सुरवात केलेली आहे. २. गर्दीचे ठिकाणी संपूर्ण जिल्हयात कॉर्नर बैठका आयोजीत करून अपधात टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सुरवात केलेली आहे. १. व्यापारी संघटना यांचेशी समन्वय साधुन शहरातील, बाजार पेठातील गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यापारी लोकांचे मदतीने अत्तीक्रमणे दुर करण्यास सुरवात करण्यात येत आहे. ४) विषेश मोहिमा नो हेल्मेट नो फ्यूल पोलीस विशेष मोहिम १. पेट्रोल पंप मालकांशी समन्वय साधून दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट वापरण्याकरीता प्रोत्साहीत करण्यात येत आहे. १. दर आठवडयातून दोन दिवस विशेष नाकाबंदी राबवून वाहतुकिचे नियम मोडणा-या वाहन चालकांकडून रस्ता सुरक्षेची शपथ लिहून घेण्यास सुरवात केलेली आहे. २. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या विशेष मोहिम राबविण्यात येत असुन अचानक नाकाबंदीचे आयोजन करण्यात येत आहे ३. वाहतुक नियमांसबधी पो स्टे स्तरावर कार्यशाळा आयोजीत करण्यास भर देण्यात येत असुन नविन लायसन्स करिता पोलीस स्टेशन स्तरावर कॅम्पचे आयोजन घेण्यात येणार आहे. ५) अपघात रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना :- रेडीयम स्टिकर्स मोहिम १. रस्त्यांवर थांबलेल्या वाहनांना रात्र पेट्रोलींग दरम्यान स्टिकर्स चिपकवण्यास सुरवात केलेली आहे. साईन बोर्ड २. बैलगाडी, ट्रैक्टर ट्रॉली, ट्रक, टैम्पो अशा वारंवार अपघात होणा-या मोठ्या वाहनांना रिप्लेक्टर्स लावण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. १. धोकादायक वळण असलेल्या ठिकाणी अपघात प्रवण स्थळ बोर्ड तयार करुन लावण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. २. जिल्हयातील संपूर्ण ब्लैक स्पॉट स्थळी साईन बोर्ड तयार करुन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३. अपघात झालेल्या ठिकाणी भेटी देवून अपघाताचे करण शोधून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे व त्या ठिकाणी साईन बोर्ड लावण्यात येत आहेत. अपघात कारण १.अपघात कमी करण्यासाठी ईतर विभागाची मदत घेवून उपाययोजना करण्यास सुरवात केलेली आहे. उपरोक्त प्रमाणे आपल्या जिल्हयातील अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस घटकातर्फ मा. पोलीस अधिक्षक, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांचे अधिकारी अंमलदार उपाययोजना राबवित असून वाहन चालविणा-या चालकाने वाहनुकिच्या नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर, सिट बेल्टचा वापर करण्याचे अवाहन केलेले आहे

- वर्धा जिल्ह्यात मांस विक्रीच्या अनेक दुकानांवर मोठी कारवाई करण्यात आली. अनेक तास चाललेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात संशयित मांस जप्त करण्यात आले असून अनेक व्यापारी फरार झाले आहेत.1
- आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ.. शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!1
- नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषदेत बांधकाम सभापती शुभम गोहाड यांच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, काही नागरिक विकासकामांच्या चौकशीची मागणी करत आहेत. मात्र, गोहाड समर्थकांकडून विकासकामे झाल्याचा दावा केला जात आहे.1
- अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- वर्धा जिल्ह्यात एका पूजेदरम्यान गॅस सिलेंडर अचानक संपले. ३००० रुपये देऊनही गॅस उपलब्ध झाला नाही, ज्यामुळे कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली. यामुळे परिसरातील गरीब कुटुंबांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- वर्धा जिल्ह्यातील सई नदीच्या काठी एका व्यक्तीने झाडाला लटकून आत्महत्या केली. कोतवाली नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत राज यांनी या संदर्भात माहिती दिली.1
- नागपूरच्या हिंगणा परिसरात काल अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने हाहाकार माजवला. रायपूर मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका इमारतीवरील जाहिरात फलकाचे 'मुंडन' झाले. या घटनेवरून वाऱ्याचा प्रचंड वेग स्पष्ट दिसतो.1