चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यातर्फे वतीने पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त जूलूस रॅलीचे उत्साहात स्वागत चंद्रपूर: पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) चंद्रपूर शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य जूलूस (रॅली) काढण्यात आला. या रॅलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चंद्रपूर शहराच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि बंधुभावाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चंद्रपूरच्या शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी प्रमुख उपस्थिती लावून रॅलीचे स्वागत केले आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या, "ईद-ए-मिलादचा हा पवित्र दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. समाजात परस्पर प्रेम, आदर आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी आणि माणुसकीचा प्रकाश कायम राहावा," अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने बेबीताई उईके (शहर जिल्हाध्यक्ष),विठ्ठल मस्की (ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष), बब्बूभाई ईसा (अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष),रुपेश मुलकावार (शहर सरचिटणीस), महेश चहारे (शहर पदाधिकारी), सुभाष नन्नावरे (शहर पदाधिकारी) या सर्वांच्या उपस्थितीत रॅलीतील नागरिकांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे चंद्रपूर शहरातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यातर्फे वतीने पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त जूलूस रॅलीचे उत्साहात स्वागत चंद्रपूर: पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) चंद्रपूर शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य जूलूस (रॅली) काढण्यात आला. या रॅलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चंद्रपूर शहराच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि बंधुभावाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चंद्रपूरच्या शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी प्रमुख उपस्थिती लावून रॅलीचे स्वागत केले आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या, "ईद-ए-मिलादचा हा पवित्र दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. समाजात परस्पर प्रेम, आदर आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी आणि माणुसकीचा प्रकाश कायम राहावा," अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने बेबीताई उईके (शहर जिल्हाध्यक्ष),विठ्ठल मस्की (ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष), बब्बूभाई ईसा (अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष),रुपेश मुलकावार (शहर सरचिटणीस), महेश चहारे (शहर पदाधिकारी), सुभाष नन्नावरे (शहर पदाधिकारी) या सर्वांच्या उपस्थितीत रॅलीतील नागरिकांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे चंद्रपूर शहरातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.
- गडचांदुरात पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरी, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोरटा चंद्रपूर - गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असतानाच चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल १ लाख २ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडली. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोरटा कॅबिनमध्ये शिरून रोकड घेऊन पसार होत असताना तिथे झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग आली नाही. दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून, फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असून, फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- Fatty Liver? Best & Worst Foods You Need to Know ! 🚨🔥 In this video, Dr Meher Abbas reveals which everyday foods may be better choices for fatty liver—and which ones you may want to limit. From fruits and vegetables to nuts, seeds, flour and one popular drink, some of the answers may surprise you. Watch till the end if you have fatty liver, high cholesterol, belly fat, insulin resistance or metabolic health concerns. ************************ For Online Consultation: For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays) ************************** For Collaboration & Business Enquiries : What's ap:91-9125734374 ———————————————————————————— IMPORTANT DISCLAIMER - The information in the Video Content posted on the Nutexy YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel. Keywords : #DrMeherAbbas #NAFLD #FattyLiver #LiverFriendlyFoods #BestFruitInFattyLiver #BestVegetableInFattyLiver #BestNutInFattyLiver #BestSeedInFattyLiver #BlackCofeeInFattyLiver @TopFan1
- पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ), सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद ) सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण ) निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे, सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे, जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत, सदस्य - शरद मिरे, अमर मोकाशी, जितेंद्र धोटे, राम वाघमारे, हर्षल राऊत, निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. #SalwaCrime #KuhiPolice #SuperstitionNews #MaharashtraNews #NagpurNews विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): #अंधश्रद्धा #साळवा #कुही #अघोरीपूजा #भानामती #स्मशानभूमी #महाराष्ट्रबातम्या #जादूटोणाविरोधीकायदा विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): #BlackMagicNews #StopSuperstition #CrimeUpdate #PoliceInvestigation #LocalNews1
- *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न* *जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश* *अखिल आर्यवर्त संघ* *आंतरराष्ट्रीय बजरंग दल / आंतरराष्ट्रीय दुर्गाशक्ती परिषद* *विदर्भ प्रांत, बुलढाणा जिल्हा* *दिनांक: 25-08-2026, मंगळवार* --- *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न* *जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश* *बुलढाणा:* आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे *संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिनेश दादा पाटील जी* यांच्या मार्गदर्शनात आज विदर्भ प्रांतात संघटन विस्ताराचे कार्य जोमात सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 25-08-2026 रोजी *विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. श्री संतोष सिंह ठाकूर जी* यांच्या मार्गदर्शनात व *बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. श्री शुभम राजेश पाटमासे जी* यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा तालुक्यातील *पिंपळखुटा व परिसरातील गावांची* आंतरराष्ट्रीय बजरंग दल कार्यकारिणी विस्तार बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या पुढील कार्याची दिशा, हिंदुत्वाचे कार्य गावागावात पोहोचवणे आणि युवकांना धर्मकार्यात जोडणे यावर चर्चा करण्यात आली. *यावेळी उपस्थित वीर बजरंगी:* आदित्य टाले, सतिश शिवाजी दराडे, देवानंद आनंद जायभाये, समाधान सानप, अभिषेक ताठे, सतिश गुठे, ऋषिकेश काकड, हर्षल दराडे, नितीन घुगे, भगवान घुगे, गणेश दहीवाळ, शिवम घुगे, भागवत घुगे, ऋषिकेश घुगे, आदित्य घुगे, सुजीत ताठे, सिद्धेश्वर दराडे, स्वप्नील घुगे, संदीप ताठे, रघुनंदन ताठे, शिवानंद नागरे, गणेश ताठे, समाधान जायभाये, उमेश ताठे व अन्य असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा समारोप *।। जय श्रीराम ।।* च्या प्रचंड जयघोषाने झाला. *निवेदक:* *श्री शुभम राजेश पाटमासे* *जिल्हाध्यक्ष - बुलढाणा* *आंतरराष्ट्रीय बजरंग दल, विदर्भ प्रांत*1