शिरूरहून अक्कलकोटसाठी थेट बससेवा 21 एप्रिलपासून सुरू होणार शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: प्रवासी व भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत शिरूर बस स्थानकातून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरासाठी थेट बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या मंगळवार, 21 एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांनी दिली. शिरूर परिसरातून अक्कलकोटकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून, दररोज नियमित बससेवेची मागणी वाढत होती. याची दखल घेत ही नवीन सेवा सुरू करण्यात येत आहे. दररोज दुपारी २ वाजता बस शिरूर बस स्थानकातून सुटणार असून, नावरा, केडगाव चौफुला व इंदापूर मार्गे सायंकाळी सुमारे ८ वाजता अक्कलकोट येथे पोहोचेल. बस मुक्कामी थांबणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता परतीचा प्रवास सुरू करून दुपारी १ वाजता शिरूर येथे आगमन होईल. उन्हाळी भाडेवाढ लक्षात घेऊन या सेवेसाठी तिकीट दर ५५० रुपये निश्चित करण्यात आला असून, महिलांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध राहणार आहे. याशिवाय, ४० प्रवाशांचे समूह बुकिंग केल्यास साडेतीन शक्तीपीठे तसेच पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थक्षेत्रांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उज्जैन, इंदूर व ओंकारेश्वर यात्रेसाठीही विशेष बससेवेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उज्जैन यात्रेसाठी पुरुष प्रवाशांसाठी ये-जा भाडे २४०० रुपये असून, महिलांना सवलत दिली जाणार आहे. या नव्या बससेवेचा प्रवासी व भाविकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांनी केले आहे.

- 🚨 महत्त्वाचे आवाहन: वाढत्या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करा! 🚨 जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असून, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ✅ नागरिकांनी काय काळजी घ्यावी? 🧢 उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर रुमाल बांधा किंवा टोपीचा आवर्जून वापर करा. 💧 शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी, ताक किंवा इतर द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. 👨🌾 विशेष लक्ष द्या: गरोदर माता, शेतकरी, कामगार आणि आजारी व्यक्तींनी वाढत्या उन्हाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 🏥 प्रशासनाची तयारी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये (RH) आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) 'कूल रूम्स' (Cool Rooms) तयार करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ⚠️ लक्षात ठेवा : उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) कोणताही त्रास किंवा लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या! ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा. #Ahilyanagar #HeatwaveAlert #SummerSafety #CollectorAppeal #StayHydrated #Maharashtra #DrPankajAshiya #PublicHealth #StayCool1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी मुलै प्रियकरावर केला गुन्हा दाखल!1
- आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all1
- पिंपरी चिंचवड :- काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे... : राजेंद्र बहिरट ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेवाडी ) #पिंपरीचिंचवड #काळेवाडी #बालसुरक्षा #लैंगिकअत्याचार #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #निर्भयमहाराष्ट्र #बालहक्क #कडककारवाई #सुरक्षितबालपण #PimpriChinchwad #Kalewadi #ChildSafety #CrimeNews #SexualAbuse #PoliceAction #JusticeForChild #StopChildAbuse #ProtectChildren #LawAndOrder1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by कर्जत लाईव्ह1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमात त्यांनी समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #सामाजिक_समता #अहिल्यानगर #समता_सप्ताह #प्रेरणादायी_विचार1