logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक, 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी एका कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ते दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत मॉर्निंग वॉकला जात असत आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना हॉटेल षडानन समोर त्यांना एका कारने मागून जोरदार धडक दिली. मनमिळावू स्वभावाचे असलेल्या भारत बेहेरे यांना धडक देणारा चालक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय 30, रा. किशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) होता. तो आपली MH 09 CJ 7676 क्रमांकाची क्रिएटा कार घेऊन घरच्या मंडळींसह माहूर येथे दर्शनासाठी येत होता. सकाळची वेळ असल्याने चालकाला समोरून येणारे भारत बेहेरे दिसले नाहीत किंवा काही समजण्याआधीच त्यांच्या गाडीने बेहेरे यांना मागून जोराची धडक दिली. धडकेमुळे भारत बेहेरे रस्त्यावर पडून 30 ते 35 फूट फरफटत गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून, माहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके, पो उप नी बाबू जाधव आणि पो का पवन राऊत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मनमिळावू स्वभावाच्या भारत बेहेरे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

4 hrs ago
user_Dhananjay Govindrao Aradhye
Dhananjay Govindrao Aradhye
Newspaper advertising department माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
4 hrs ago

माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक, 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी एका कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ते दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत मॉर्निंग वॉकला जात असत आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना हॉटेल षडानन समोर त्यांना एका कारने मागून जोरदार धडक दिली. मनमिळावू स्वभावाचे असलेल्या भारत

बेहेरे यांना धडक देणारा चालक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय 30, रा. किशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) होता. तो आपली MH 09 CJ 7676 क्रमांकाची क्रिएटा कार घेऊन घरच्या मंडळींसह माहूर येथे दर्शनासाठी येत होता. सकाळची वेळ असल्याने चालकाला समोरून येणारे भारत बेहेरे दिसले नाहीत किंवा काही समजण्याआधीच त्यांच्या गाडीने बेहेरे यांना मागून जोराची

धडक दिली. धडकेमुळे भारत बेहेरे रस्त्यावर पडून 30 ते 35 फूट फरफटत गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून,

0aa2ae01-828a-4a81-bae3-1a9d1a095552

माहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके, पो उप नी बाबू जाधव आणि पो का पवन राऊत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मनमिळावू स्वभावाच्या भारत बेहेरे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांत गारपीट झाली आहे. याचबरोबर, शहरातही रिमझिम पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.
    1
    महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांत गारपीट झाली आहे. याचबरोबर, शहरातही रिमझिम पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • बोगस फेरफार प्रकरणांमध्ये कलम १५८ चा आधार घेतला जात असून, यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रश्न असा आहे की, कलम १५८ चा हा वापर महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आहे की केवळ तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहे.
    1
    बोगस फेरफार प्रकरणांमध्ये कलम १५८ चा आधार घेतला जात असून, यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रश्न असा आहे की, कलम १५८ चा हा वापर महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आहे की केवळ तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    3 hrs ago
  • मुंब्रा शीळमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असून, लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
    1
    मुंब्रा शीळमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असून, लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    23 min ago
  • एका विद्यापीठात नियमांचे उल्लंघन करत, आवश्यक पात्रता नसतानाही वातानुकूलित (AC) उपकरणांचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली आहे. नियमांना धाब्यावर बसवून चाललेल्या या गैरवापरामुळे मनविसे संतापली असून, त्यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
    1
    एका विद्यापीठात नियमांचे उल्लंघन करत, आवश्यक पात्रता नसतानाही वातानुकूलित (AC) उपकरणांचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली आहे. नियमांना धाब्यावर बसवून चाललेल्या या गैरवापरामुळे मनविसे संतापली असून, त्यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    Video Creator वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री जींना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
    1
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री जींना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे वेगात सुरू असताना, डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुखेड-लातूर महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या पावसाळ्यापूर्वी शेतकरी मशागतीची कामे, पेरणीपूर्व तयारी आणि इतर शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती अवजारे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र, डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे शेतीच्या कामासाठी महत्त्वाचा वेळ वाया जात असून मशागतीची कामे खोळंबत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    1
    मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे वेगात सुरू असताना, डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुखेड-लातूर महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सध्या पावसाळ्यापूर्वी शेतकरी मशागतीची कामे, पेरणीपूर्व तयारी आणि इतर शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती अवजारे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र, डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे शेतीच्या कामासाठी महत्त्वाचा वेळ वाया जात असून मशागतीची कामे खोळंबत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भाजप नेते हाजी अरफात यांनी पोलीस आणि गोरक्षकांवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संतप्त होऊन म्हटले की, बकऱ्यांची वाहने का पकडली जात आहेत.
    1
    भाजप नेते हाजी अरफात यांनी पोलीस आणि गोरक्षकांवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संतप्त होऊन म्हटले की, बकऱ्यांची वाहने का पकडली जात आहेत.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • ठाणे महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीसनंतर दिव्यांग व्यक्तींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आपल्या सर्व समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची जोरदार मागणी केली आहे.
    1
    ठाणे महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीसनंतर दिव्यांग व्यक्तींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आपल्या सर्व समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची जोरदार मागणी केली आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पंचायत समिती सदस्य सौ शांताबाई माने यांनी पिक विमा मिळण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी सौ शांताबाई माने यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी ठाकरे सेना शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट केले.
    1
    पंचायत समिती सदस्य सौ शांताबाई माने यांनी पिक विमा मिळण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणादरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी सौ शांताबाई माने यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी ठाकरे सेना शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट केले.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.