अलिबाग येथील बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास येथे ३३ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या ग्रंथपाल नथुराम परशुराम म्हात्रे सरांना शनिवार, ३० मे २०२६ रोजी सेवापूर्ती निरोप देण्यात आला. श्री म्हात्रे सर नियत वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास येथे हा सत्कार समारंभ संपन्न झाला. नथुराम म्हात्रे सर १५ सप्टेंबर १९९२ रोजी बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास येथे अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून रुजू झाले होते. १३ एप्रिल २०२३ पासून शासनाने त्यांना या शाळेसोबतच इंडियन एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा, वरसोली आणि महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे या शाळांचा कार्यभार देऊन पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता दिली होती. त्यांनी आजवर अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे ग्रंथपाल म्हणून आपली सेवा दिली आहे, एकूण ३३ वर्षे, ८ महिने आणि १६ दिवसांचा त्यांचा प्रदीर्घ सेवाकाळ आहे. निरोप समारंभाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या यथोचित स्वागताने झाली. त्यानंतर शिक्षकेत्तर कर्मचारी मधुमती गायकर वहिनी, सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील मॅडम, प्रिती कवळे मॅडम आणि शतदा राऊत मॅडम यांनी नथुराम परशुराम म्हात्रे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती पूजा नथुराम म्हात्रे यांचे औक्षण केले. संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने श्री म्हात्रे सरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे यांच्यातर्फे तसेच उपस्थित विद्यार्थी व मित्रपरिवारातर्फेही नथुराम म्हात्रे सरांना भेटवस्तू देण्यात आल्या आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सुहास म्हात्रे, दीपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, माजी सहाय्यक शिक्षक महादेव कोळी सर, माजी लिपिक अण्णा राणे सर, प्रकाश राणे सर, माजी शिक्षकेत्तर कर्मचारी अजित किणी, साधन व्यक्ती प्रशांत ठाकूर सर, विद्यमान मुख्याध्यापक अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, बालवाडी प्रमुख प्रमोदिनी पाठक मॅडम, प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नथुराम म्हात्रे सर यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी दीपक राऊळ, प्रमोद भगत सर, अनिल दारकुंडे सर, गणेश राणे सर, सहाय्यक शिक्षक धनराज फड सर, अजित नाईक सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश गिरी आणि नथुराम म्हात्रे सरांचे मित्र प्रवीण म्हात्रे यांनी आपली मनोगते व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नथुराम म्हात्रे सरांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी आणि विद्यालयाविषयी असलेल्या आपल्या भावना आणि ऋणानुबंध व्यक्त केले. त्यांनी संस्थेला आणि विद्यालयाला ब्लूटूथ स्पीकर भेट दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सन्मानपत्राचे वाचन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर नथुराम परशुराम म्हात्रे सरांनी दिलेल्या अल्पोपहाराचा उपस्थित सर्वांनी आस्वाद घेतला.

- कामठी शहरात स्वच्छता अभियानाचे दावे फोल ठरताना दिसत आहेत. आमच्या विशेष अहवालानुसार, बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे, अनधिकृत अतिक्रमणे वाढली आहेत आणि मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. २०० कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध असूनही, शहरातील व्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. यामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित जबाबदार व्यक्तींवर नगर परिषद कारवाई करणार का, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.1
- उन्हाळ्यात रक्तातील साखर का वाढते यामागील खरे सत्य जाणून घेण्यासोबतच, डॉ. मेहर अब्बास प्रत्येक आरोग्य समस्येवर योग्य आणि सुरक्षित उपाय देत आहेत. आजच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण निरोगी जीवनाची सुरुवात योग्य सल्ल्याने होते. डॉ. मेहर अब्बास हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार आणि फुफ्फुसाच्या (दमा आणि टीबी) समस्यांवर समाधान प्रदान करतात. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात 50 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विविध विकास कामांना गती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, क्षेत्रातील प्रमुख जनसमस्या, मूलभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा-कौसा येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक मागण्या प्रमुखतेने मांडल्या.1
- नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.1
- सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.1
- मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.1
- चारबाग येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर छत कोसळल्याची घटना घडली, ज्यात दोन व्यक्ती गंभीरपणे अडकले. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बचावकार्यात उशीर का झाला, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.1