पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपोत झालेल्या दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या आणखी ७ नागरिकांचे मृतदेह हाती आले असून, दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा मोठा ढीग 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने ही गंभीर दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवेळी इमारतीमध्ये २२ आणि इमारतीशेजारी कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी ५ नागरिक स्वतः सुखरूप बाहेर पडले, तर पहिल्याच दिवशी भारतीय लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून ९ जणांना सुरक्षित बाहेर काढले होते. यानंतर ९ जुलै रोजी इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या भावेश वाणी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर काल रात्री एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीनच्या साहाय्याने इमारतीचा अस्थिर आणि धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवण्यात आला. त्यानंतर इमारतीत सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) आणि राहुल गायकवाड (वय ३५, मोशी) यांचे मृतदेह हाती आले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीअखेर त्यांना मृत घोषित केले. सध्या इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली अडकलेल्या एका नागरिकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेऊन विविध यंत्रणांच्या साहाय्याने ही शोधमोहीम अविरतपणे सुरू ठेवण्यात येत आहे.

- पिंपरी चिंचवडमध्ये 'इथून जाऊन बसतो ऑटोक्लस्टरला, तिथे सेटिंग..........!' अशा शब्दांत थेट आणि उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे. या सूचक विधानाद्वारे ऑटोक्लस्टर येथील कथित 'सेटिंग'वर अत्यंत संशयास्पद आणि खोचक बोट ठेवण्यात आले आहे.1
- पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे झालेल्या दुर्घटनेत दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेतील या दुसऱ्या मृत्यूबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकृत माहिती दिली आहे.1
- महापालिकेकडे उद्ध्वस्त करण्यासाठी यंत्रणा आहे पण सावरण्यासाठी नाही, अशी स्पष्ट भूमिका कामगार नेते यशवंत भोसले यांनी मांडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना तात्काळ सेवांमध्ये कायमस्वरूपी करण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.1
- पुण्याच्या हडपसर येथील १५ नंबर परिसरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी हडपसर परिसरात प्रचंड गर्दी केली होती.1
- आज पहाटे ४:४५ वाजता श्री विठ्ठल भगवान आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी माता मंदिर, कसबा पेठ परिसरातून मार्गस्थ झाली. या पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून, नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि श्रद्धा दिसून येत आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, ही पालखी दुपारी २:३० वाजेपर्यंत हडपसर येथे पोहोचणार आहे. पुणे ते पंढरपूर या पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.3
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षासोबत सुरू असलेल्या कथित चर्चेच्या राजकीय वर्तुळातील चर्चांवर आता खा. सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी नेमके काय सांगितले, याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घडामोडींनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली असून, शरद पवारांनी या संदर्भात काय भूमिका मांडली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- पुण्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. पोलिसांनी थेट कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली असून, या धडक कारवाईमुळे आता गुन्हेगारांचे धाबे पार दणाणले आहेत.1