भोंदू बाबा कडे जाण्यापासून महिलांना थांबवावे (महाराष्ट्र अंनिसचे नागरिकांना आव्हान) भोंदू बाबा कडे जाण्यापासून महिलांना थांबवावे (महाराष्ट्र अंनिसचे नागरिकांना आव्हान) नागपूर (३१.३.२०२५) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा च्या वतीने व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर भोंदूबाबा अशोक खरात च्या विरोधात निदर्शने करण्यात आली. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने सबंध महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. हे कृत्य केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून, ते एक राजकीय हितसंबंधातून घडून येणारे बुवाबाजीचे गंभीर प्रकरण आहे. बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिक ईत्यादींचा शोध घेउन अंधश्रद्धा पसरवून भोळ्या भाबड्या स्त्रियांचे लैंगीक शोषण करणाऱ्या वाईट प्रवृत्तींना जादूटोणाविरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरकारतर्फे कठोर पावले उचलण्यात यावी असे राज्य उपाध्यक्ष संजय शेंडे यांनी सांगितले. तर नागरिकांनी आपापल्या महिलांना भोंदू बुवा बाबाकडे पाठवण्यापासून थांबवावे तरच अशा अशोक खरात सारख्या भोंदू बाबांची दुकानदारी बंद होईल असे आव्हान जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग यांनी केले. जनतेने आपल्या समस्यांचे समाधान हे ज्योतिष्याद्वारे आणि कर्मकांडातून नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाने करावे. अशोक खरात सारख्या भोंदुबुवांच्या नादी न लागता शोषक प्रवृत्तीस आळा बसवावा असे जनतेस आवाहन केले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष संजय शेंडे, जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे, जिल्हा प्रधान सचिव विनोद उलीपवार, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद ढोबळे, सुधाताई बामनपल्लीवार, रंजना कोल्हे, मालती वराडे, संजय लाडे, शशिकांत रायपुरे, विलास भालेराव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी केली तर आभार विनोद उलीपवार यांनी मानले.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- औराई सीओ के खिलाफ ख़बर नहीं चलाने के लिए सीओ के करीबी ने पत्रकार को धम/काया! #aurai #अंचल #VijaySinha #biharpolice #Muzaffarpurpolice #BreakingNews #muzaffarpur #worldbiharnews #viralreels1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1