जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धीवरे डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे गुन्हे शाखेच्या अधीक्षकपदी बदली जळगाव : भारतीय पोलीस सेवेतील नऊ अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या असून त्यात जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पोलीस अधीक्षकपदावर धुळ्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॅशिंग तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून धीवरे यांची धुळे जिल्ह्याला ओळख आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली सांगली येथे करण्यात आली असून पुणे येथील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) पदावर करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून (तात्पुरत्या स्वरूपात) जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक एम. सेरा यांची पदोन्नतीसह पोलीस अधीक्षक, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) करण्यात आली असून धुळेचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती जळगाव येथे करण्यात आली आहे. पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.1
- प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1