देगलूर महाविद्यालयात शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. देगलूर: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत देगलूर महाविद्यालयास अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे . या प्राप्त श्रेणीसाठी देगलूर महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला.या शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकरहोते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ.कर्मवीर उनग्रतवार उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार;सहसचिव राजकुमार महाजन कार्यकारणी सदस्य सूर्यकांत नारलावार रवींद्र आप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार विजयकुमार उनग्रतवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. सोमनाथ पवार, प्रकाश सोनकांबळे यांनी ध्येय सेवा गीत गायन केले. प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ.शेरीकर व्हि.जी. यांनी गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत महाविद्यालयात सर्व क्षेत्राचे कार्य कसे पूर्ण केले यावर प्रकाश टाकत सर्व क्षेत्राची माहीती दिली तर उपप्राचार्य डॉ. एम.एम. चमकुडे यांनी सर्व संयोजकांनी केलेल्या कार्याबद्दलची माहिती देऊन अभिनंदन केले.मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी आपल्या महाविद्यालयाचे काम नॅक अंतर्गत पूर्ण झालेले असल्याने या मूल्यांकनासाठी कुठलीही कमतरता भासली नाही. आपल्या महाविद्यालयाने जिल्ह्यात अव्वल स्थान कमाविले आहे असे सांगत पुढे ही यावर काम केले पाहिजे.असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव डॉ.कर्मवीर उनग्रतवार यांनी प्रत्येक शिक्षकांनी मेहनत घेतली आहे या कामी उत्कृष्ट कार्य करण्याचा जो ध्येय आपण ठेवला याचे यश आपल्याला नक्की मिळालेले आहे असे प्रतिपादन करून त्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी संयोजक प्रा.लागले टी.एन, प्रा.तोटावार के.व्ही., प्रा.संतोष वानोळे प्रा.ई.के. पाटील; प्रा.महेश कुलकर्णी, प्रा.नरेंद्र मुक्तावार या सहा संयोजकांचा, व सर्व समिती सदस्यांचा,पर्यवेक्षक एस.एन. पाटील, उपप्राचार्य प्रा.डाॅ.शेरीकर व्ही.जी.,उपप्राचार्य डाॅ.चमकुडे एम.एम.यांचा सत्कार करण्यात आला याच वेळी ग्रामीण भागातील उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मानित झालेले डॉ.मोहन खताळ तसेच करिअर कट्टाचे प्रा.डॉ.माधव चोले प्रा.डॉ.काशिंदे सुरेश व सर्व करिअर कट्टा संसद विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार ,अधीक्षक गोविंद जोशी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गुरूडे एस.बी.तर आभार पर्यवेक्षक प्रा. एस. एन.पाटील यांनी मानले

- Post by Today One Live1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप5
- मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘ च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत2
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1