व्यवसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध -संतोष कुमार नाईकवाडी व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी – संतोषकुमार नाईकवाडी लातूर (प्रतिनिधी) शालेय शिक्षणानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे हे विद्यार्थी स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले. ते जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधिर विद्यालय आणि मतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त पालक मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, सचिव धनंजय देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकला भार्गव, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर अग्रवाल, संजय निलेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी तसेच जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाईकवाडी यांनी पुढे सांगितले की, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमां मध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा वेळ सकारात्मक उपक्रमांमध्ये जाईल आणि मोबाईलचा अतिरेक टाळता येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांनीही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. लग्न समारंभ व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यावरही त्यांनी भर दिला.प्रास्ताविकात पी.व्ही. कुलकर्णी यांनी संस्थेचा आढावा घेत पालक व शाळां मधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे सचिव धनंजय देशमुख यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जयश्री कुलकर्णी, जयलाल गायकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 240 पालकांचा सहभाग या पालक मेळाव्यात तिन्ही शाळांमधील सुमारे 240 पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध अभ्यासक्रम, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत विशेष शिक्षक सिंधु इंगळे, डी.डी. कांबळे आणि बंकट पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
व्यवसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध -संतोष कुमार नाईकवाडी व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी – संतोषकुमार नाईकवाडी लातूर (प्रतिनिधी) शालेय शिक्षणानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे हे विद्यार्थी स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले. ते जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधिर विद्यालय आणि मतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त पालक मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, सचिव धनंजय देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकला भार्गव, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर अग्रवाल, संजय निलेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी तसेच जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाईकवाडी यांनी पुढे सांगितले की, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमां मध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा वेळ सकारात्मक उपक्रमांमध्ये जाईल आणि मोबाईलचा अतिरेक टाळता येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी पालकांनीही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. लग्न समारंभ व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यावरही त्यांनी भर दिला.प्रास्ताविकात पी.व्ही. कुलकर्णी यांनी संस्थेचा आढावा घेत पालक व शाळां मधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे सचिव धनंजय देशमुख यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जयश्री कुलकर्णी, जयलाल गायकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 240 पालकांचा सहभाग या पालक मेळाव्यात तिन्ही शाळांमधील सुमारे 240 पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध अभ्यासक्रम, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत विशेष शिक्षक सिंधु इंगळे, डी.डी. कांबळे आणि बंकट पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
- उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.2
- लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले1
- सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले1
- Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...1
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप5
- 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment1