धामणी खंडोबाच्या दीपमाळ बांधकामासाठी सोनेवाडी ग्रामस्थांची १ लाख १९ हजारांची देणगी... 📝 तेजस वाळुंज l पुणे जिल्हा प्रतिनिधी धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिराच्या महाद्वारासमोर लोकसहभागातून नवीन दगडी दीपमाळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या बांधकामाची माहिती सोनेवाडी बुद्रुक (ता. निफाड, जि. नाशिक) येथील, धामणीचे खंडोबा देवस्थान कुळदैवत असलेल्या समस्त पडोळ पाटील मंडळींना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत १ लाख १९ हजार ६१६ रुपयांची स्वेच्छा देणगी जमा करून देवस्थानाला प्रदान केली. सोनेवाडी बुद्रुक येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन देवस्थानाच्या दीपमाळ बांधकामासाठी गावाच्या वतीने सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ग्रामस्थांनी स्वेच्छेने एकत्रितपणे रुपये १,१९,६१६ (रुपये एक लाख एकोणीस हजार सहाशे सोळा फक्त) इतकी देणगी जमा केली. मंगळवारी (ता. १५ सप्टेंबर) सोनेवाडी बुद्रुक येथून ४० हून अधिक ग्रामस्थ दहाहून अधिक चारचाकी वाहनांमधून धामणी येथील खंडोबा देवस्थानात दाखल झाले. कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भंडारा उधळण्यात आला. त्यानंतर १ लाख १९ हजार ६१६ रुपयांची देणगी देवस्थानाचे सेवेकरी व ग्रामस्थ मंडळींच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी सेवेकरी व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने समस्त सोनेवाडी बुद्रुक ग्रामस्थांना देणगीची पावती देण्यात आली. या वेळी प्रविण अशोक पडोळ पाटील, योगेश पडोळ, भाऊराव पडोळ, उत्तम पडोळ, प्रविण भाऊराव पडोळ, नंदू पडोळ, नारायण पडोळ, सिताराम आहेर, रामदास पडोळ, सुनिल पडोळ, जनार्दन पडोळ, अनिल पडोळ, राजू पडोळ, ईश्वर पडोळ, रमेश पडोळ, संदीप पडोळ तसेच समस्त पडोळ पाटील मंडळी उपस्थित होती. समस्त पडोळ पाटील मंडळींचा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने पहाडदऱ्याचे सरपंच मच्छिद्र वाघ, दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, दगडू करंजखेले, माऊली बोऱ्हाडे यांनी मानाची टोपी, शाल व श्रीफळ प्रदान करून सत्कार केला. दीपमाळ ही केवळ प्रकाशाचे साधन नसून देवस्थानाच्या तसेच गावाच्या वैभवाचे आणि संपन्नतेचे प्रतीक मानली जाते. नवीन दीपमाळेच्या बांधकामासाठी रोख देणगी देणाऱ्या समस्त सोनेवाडी बुद्रुक ग्रामस्थ (ता. निफाड, जि. नाशिक) व पडोळ पाटील मंडळींचे धामणी, शिरदाळे, पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती येथील समस्त ग्रामस्थ, सेवेकरी, मानकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

- अधिकाऱ्यांची दिवाळी आधीच? PMC मध्ये १० हजारांचे २२ गिफ्ट बॉक्स जप्त, चौकशी सुरू!1
- दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- ब्रेकिंग न्यूज़ | मुरुड जंजिरा, रायगड रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। ब्रेकिंग न्यूज़ | रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि बिना किसी पूर्व सूचना या नोटिस के उनके घरों पर स्मार्ट मीटर लगाए जा रहे थे। इतना ही नहीं, नागरिकों का कहना है कि उनकी आपत्ति के बावजूद जबरदस्ती स्मार्ट मीटर लगाने का प्रयास किया जा रहा था। इस पूरे मामले में स्थानीय नागरिक ताबीश ढाकम ने भी लोगों का साथ देते हुए उनकी आपत्तियों और समस्याओं को सामने रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। स्थानीय लोगों के अनुसार, ताबीश ढाकम ने नागरिकों की बात संबंधित कर्मचारियों और प्रशासन तक पहुंचाने का प्रयास किया और बिना उचित जानकारी के मीटर लगाए जाने पर सवाल उठाए। इस घटना को लेकर स्थानीय लोगों में नाराजगी देखी जा रही है। नागरिकों का सवाल है कि आखिर बिना सूचना दिए मीटर क्यों लगाए जा रहे हैं? अगर किसी नागरिक को आपत्ति है, तो उसकी बात क्यों नहीं सुनी जा रही है? स्थानीय लोगों ने संबंधित बिजली विभाग और प्रशासन से पूरे मामले की जांच करने, नागरिकों को स्मार्ट मीटर की पूरी जानकारी देने और उनकी शिकायतों का समाधान करने की मांग की है। अब सवाल यह है कि क्या स्मार्ट मीटर लगाने से पहले नागरिकों को उचित सूचना दी गई थी या नहीं? इस मामले में बिजली विभाग का आधिकारिक पक्ष सामने आना भी जरूरी है। राहील शाह की रिपोर्ट मुरुड जंजिरा से1
- *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* प्रतिनिधी स्वाती हडकर *रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.* माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. *प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प* जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे. *नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण* पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे. विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे. *प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले. वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 0001
- शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.1
- "......भाषा यापुढे सहनही करणार नाही.., हेही स्पष्ट करतो..!"1
- विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळली! थोडक्यात मोठा अनर्थ टळला; ST सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह1
- बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार1