काही मंदिरं अशा ठिकाणी वसलेली असतात जिथे आल्यावर तिथल्या वातावरणामुळे वेळ कसा निघून जातो हे कळत नाही आज मी अशाच ठिकाणी आलोय हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर एका कड्यावर वसलंय या पायऱ्या उतरल्यावर मला औदुंबराचं दर्शन झालं हे आहे जयगड मधलं श्री कऱ्हाटेश्वर मंदिर आणि हे शेकडो वर्ष जुन आहे मंदिराचा सभामंडप लाकडी आणि कौलारू आहे इथून थोडं खाली आलो आणि मला दिसला गोड पाण्याचा झरा मी इथे पोचलो तेव्हा दुपार झाली होती उन्हामुळे हैराण झालो होतो पण या झऱ्यातून येणारं पाणी प्यायलो आणि इथे असलेली हिरवळ त्यावरून ओघळणारं पाणी बघून मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न झालं या कुंडाच्या समोरच समुद्र दिसतो मग काही क्षण इथे बसून किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा मधेच येणारा पक्षांचा आवाज अशा नैसर्गिक संगीताचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो templesofmaharashtra #_mig #kokan #ratnagiri #ratnagiridiaries #kokandiaries #marathireels #maharashtra_ig #maharashtratourism Ratnagiri, Konkan tourism, Maharashtra tourism, temples in Maharashtra, spots in kokan