घाटपुरी ते श्री क्षेत्र पैठण दिंडी दिंडीचे यंदाचे 26 वे वर्ष खामगाव : श्री सद्गुरु श्रीधर महाराज सेवा मंदिरा तर्फे घाटपुरी ते श्रीक्षेत्र पैठण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी 26 रोजी सकाळी 9 वाजता ही दिंडी घाटपुरी येथून पैठण कडे रवाना होणार आहे. यात शेकडो वारकरी सहभागी होणार आहे .दिंडीचे यंदाचे 26 वर्ष आहे .2000 साला पासून ब्रह्मलीन रामभाऊ महाराज चोपडे यांनी या दिंडी ला आरंभ केला होता. तेव्हापासून आज गयात ही दिंडी पैठणला जात आहे. यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे . घाटपुरी ते श्री क्षेत्र पैठण हे 260 किलोमीटरचे अंतर आहे दिंडीत सहभागी झालेले. वारकरी 12 दिवसात पार करणार आहेत . दिंडीचा रात्री ज्या गावाला मुक्काम राहणार आहे त्या ठिकाणी कीर्तन व भारुडाचे कार्यक्रम पार पडणार आहेत .भारुडाच्या कार्यक्रमातून नशामुक्ती .व्यसनमुक्ती .यावर जनजागृती करण्यात येणार आहे .दररोज पहाटे काकडा. भजन .पूजन आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच प्रवचनाचे कार्यक्रम पार पडणार आहे .या दिंडीचा 8 ते 11 मार्च 26 या कालावधीत कावस्कर स्टेडियम नाथसागर रोड पैठण येथे आहे. 3 दिवस मुक्काम राहणार आहे .11 मार्च रोजी सकाळी काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे .आणि दुपारी श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान घाटपुरी तर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा व धार्मिक कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे . या दिंडीत वारकऱ्यांनी सहभागी होण्याचे अवाहन आयोजकांनी केले आहे. ही दिंडी घाटपुरी येथून निघून हिवरखेड. गणेशपुर टाकरखेड . बोरगाववजू बेराळाफाटा.भरोसा.आंचलवाडी .देऊळगावमही.आळंदफाटा .देऊळगावराजा.वाघोली.आनंदगड. इंदेवाडी. अंतरवाडी.अंबड .शिरनेर.पाचोड .थेरगाव.नांदर. आखातवाडा.मार्गे श्री क्षेत्र पैठण येथे पोहोचेल.

- खामगाव : खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीला दुखापत झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही घटना धार्मिक स्वरूपाची नसून वैयक्तिक वादातून घडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल शिवाजीनगर परिसरात एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. हा दगड लागल्याने घरातील मुलीला दुखापत झाली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.दगडफेकीची ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. काही समाजकंटकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या आणि धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली आहे. यात कोणत्याही धार्मिक स्थळाचा किंवा दोन समाजांचा संबंध नाही.शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा: उद्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करावा.कोणतीही संशयास्पद माहिती किंवा अफवा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.पोलीस विभागाचा सायबर सेल सध्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.3
- खामगाव: हमीद चौक परिसरात दोन गटात राडा; पोलीस प्रशासन सतर्क! #Khamgaon #Buldhana1
- ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने संपवले जीवन... तीन दिवसातील दोन घटनेने बुलढाणा शहरात अस्वस्थता.1
- Post by Ayaz patel Ayaz patel1
- Post by Raghunath Aghao1
- खामगाव : येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने खामगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शहराच्या प्रमुख मार्गांवरून 'रूट मार्च' काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.सदर रूट मार्चची सुरुवात शहर पोलीस स्टेशन जवळील पोलीस मैदान येथून करण्यात आली. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेले हे संचलन शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि उत्सवाचा आनंद शांततेत साजरा व्हावा, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.या रूट मार्चमध्ये दोन्ही पोलीस स्टेशनच्या प्रमुखांसह मोठा फौजफाटा तैनात होता. यामध्ये शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार , शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर तसेच शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचेअमलदार,होमगार्ड पथक सहभागी झाले होते.शिवजयंती निमित्त शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. रूट मार्चचा समारोप पुन्हा शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. "नागरिकांनी शिवजयंतीचा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.2