युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन *रामराज्य स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!* *कोल्हापूर ,02 सिटी न्यूज नेटवर्क आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित झाला आहे! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ’हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले. आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणार्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० पेक्षा अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सामूहिक गदापूजनात हजारो युवकांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. यात प्रामुख्याने समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असलेले मनपाडळे (पन्हाळा तालुका), तसेच जुने पारगाव येथील हनुमान मंदिरांचा समावेश होता. *‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’* ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. शाहुवाडी(मलकापूर) येथील जय हनुमान कुस्ती संकुलातील युवक यांच्यासह जिल्ह्यात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन *रामराज्य स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!* *कोल्हापूर ,02 सिटी न्यूज नेटवर्क आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित झाला आहे! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ’हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ
मिळाले. आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणार्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० पेक्षा अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सामूहिक गदापूजनात हजारो युवकांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. यात प्रामुख्याने समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असलेले मनपाडळे (पन्हाळा तालुका), तसेच
जुने पारगाव येथील हनुमान मंदिरांचा समावेश होता. *‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’* ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. शाहुवाडी(मलकापूर) येथील जय हनुमान कुस्ती संकुलातील युवक यांच्यासह जिल्ह्यात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
- कोल्हापूर श्री अंबाबाई रथोत्सव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेतले आकर्षक विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि रांगोळीची सजावट या सर्व गोष्टींनी महाद्वार रोड उजळून निघाला2
- विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- आळंदि पुणे : - पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे... धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. काल रात्री त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपायला सोडले होते. मात्र, आज सकाळी त्या परत आल्यावर दोघींचीही हत्या झाल्याचे उघड झाले. अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.... : भीमा नरके ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक ) : संगीता केदारी ( आज्जी) #आळंदी #पुणेक्राईम #दुहेरीहत्याकांड #हत्या #क्राईमन्यूज #ब्रेकिंगन्यूज #पोलीसतपास #धक्कादायकघटना #महाराष्ट्रन्यूज #सुरक्षेचाप्रश्न #Alandi #PuneCrime #DoubleMurder #MurderCase #CrimeNews #BreakingNews #PoliceInvestigation #ShockingIncident #MaharashtraNews #LawAndOrder1
- Post by Kishor subhash jadhav1
- Post by Prasad Panchal1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- कोल्हापूर: बोंद्रेनगर रोडवरील गंगाई लॉन जवळील एका सुपर बाजारला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता पाहता सुपर बाजारचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.1