कळमनुरी येथे छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात, 7513 विविध योजनांच्या लाभांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात आज दि.31 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबिरास विधान परिषदेच्या भाजपा आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिवंत सातबारा उतारे 1 हजार 151, वाटणीपत्रावरील नोंदणी फीमध्ये सवलत/लाभ 131, पाणंद रस्ते 19, अतिक्रमण नियमानुकूल अर्ज 386, घरकुल लाभार्थी 73, राज्यस्तरीय योजनांचे लाभ 5 हजार 608, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचे लाभ 20 आणि बसच्या मोफत पासचे वाटप 125 असे एकूण 7 हजार 513 लाभांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विविध विभागांच्या स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळमनुरी येथे छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात, 7513 विविध योजनांच्या लाभांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात आज दि.31 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबिरास विधान परिषदेच्या भाजपा आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिवंत सातबारा उतारे
1 हजार 151, वाटणीपत्रावरील नोंदणी फीमध्ये सवलत/लाभ 131, पाणंद रस्ते 19, अतिक्रमण नियमानुकूल अर्ज 386, घरकुल लाभार्थी 73, राज्यस्तरीय योजनांचे लाभ 5 हजार 608, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचे लाभ 20 आणि बसच्या मोफत पासचे वाटप 125 असे एकूण 7 हजार 513 लाभांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विविध विभागांच्या स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.3
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.2