अहमदपूर तालुक्यात कृषी केंद्र चालकांचा बेमुदत संप; १२५ केंद्रे बंद अहमदपूर : शहरासह तालुक्यातील सुमारे १२५ कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या जाचक अटींच्या निषेधार्थ सोमवारपासून बेमुदत संप पुकारला असून, सर्व औषधे व रासायनिक खते विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत अहमदपूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या आवाहनानुसार हा संप सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी एकजूट दाखवत आपली दुकाने बंद ठेवली असून, यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खते व किटकनाशके उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शेतीकामांना वेग आला असून, औषध फवारणी व खत व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्याच्या तुटवड्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्र मालक असोसिएशनच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शासनाने लागू केलेल्या नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण होत असल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली. नियमांमध्ये वारंवार होणारे बदल, तांत्रिक अडचणी आणि वाढलेली प्रशासकीय कटकट यामुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले. ...................... जाचक अटी रद्द करण्याची मागणी ...................... कृषी विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन परवाना नूतनीकरण प्रक्रियेत अनेक जाचक अटी घालण्यात आल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. या अटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यामध्ये खत विक्रीसाठी पीओएस मशीनची सक्ती बंद करावी, मशीनमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, कंपन्यांकडून होणारे खत पुरवठ्यातील ‘लिंकिंग’ बंद करावे, अशा मागण्यांचा समावेश आहे. तसेच शेजारील राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांवर प्रभावी बंदी घालावी, असेही विक्रेत्यांनी नमूद केले. सीलबंद पॅकिंगमधील बियाणे किंवा खत तपासणीत नापास झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता साक्षीदार मानावे, अशी महत्त्वाची मागणीही करण्यात आली आहे. तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या अधिसूचनेला विरोध दर्शवत २० जून २०२५ ची मूळ अधिसूचना कायम ठेवावी, अशी मागणी पुढे आली आहे. याशिवाय, ‘साथी’ पोर्टलचा वापर विक्रेत्यांवर सक्तीचा न करता तो कंपनी स्तरापुरता मर्यादित ठेवावा, रासायनिक खतांचा पुरवठा FOR पद्धतीने करावा व विक्री मार्जिन वाढवावे, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खतांच्या वितरणाबाबतच्या सूचनांचा फेरविचार करावा, कंपन्यांनी मुदतबाह्य किटकनाशके परत घ्यावीत, तसेच अवैध व निकृष्ट दर्जाच्या किटकनाशकांच्या विक्रीवर कडक बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नवीन बियाणे कायदा २०२५ व किटकनाशक कायदा २०२५ मधील विक्रेत्यांसाठी असलेले जाचक नियम शिथिल करावेत, विनाकारण होणारी कारवाई थांबवावी व व्यवसाय सुलभ करण्यासाठी नियमांमध्ये सुसूत्रता आणावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ...................... शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण ...................... या बेमुदत संपामुळे तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद राहिल्याने शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः खरीपपूर्व तयारी सुरू असताना खत व औषधांचा तुटवडा भासल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली असली तरी दीर्घकाळ संप चालल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ...................... मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ...................... अध्यक्ष व्यंकटराव मुसळे व उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत विक्रेते व शेतकरी या दोन्ही घटकांच्या हिताचा समतोल साधणारा तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Post by नागनाथ ससाने1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे… शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते. प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे… पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”1