logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अनंत अंबानींचे वचन पूर्ण; रिलायन्स फाउंडेशनकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस • भाविकांचा प्रवास होणार अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक • ब्रह्मोत्सवाच्या काळात नव्या बस दाखल; स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही सज्ज तिरुमला, १६ सप्टेंबर २०२६: तिरुमलाला येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशनने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे २५ इलेक्ट्रिक बस सुपूर्द केल्या आहेत. या बससाठी स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या बसांना हिरवा झेंडा दाखवला. नव्या इलेक्ट्रिक बसांमुळे दरवर्षी तिरुमलाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल. तिरुमलामध्ये ब्रह्मोत्सवाचा उत्सव सुरू असून, यावेळी मोठ्या संख्येने भाविक तिरुमलाला येत असताना या बस सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जून २०२६ मध्ये तिरुमला दौऱ्यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस देण्याचे वचन दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत रिलायन्स फाउंडेशनने हे वचन पूर्ण केले आहे. या बससाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी Jio-bp ने तांत्रिक सहकार्य केले आहे. अनंत अंबानी म्हणाले, “दरवर्षी लाखो भाविक भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तिरुमलाला येतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी योगदान देणे हे आमच्यासाठी सौभाग्य आणि जबाबदारी दोन्ही आहे. या २५ इलेक्ट्रिक बस तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रयत्नांना आमचे छोटेसे योगदान आहे. तिरुमलेश्वराच्या तीर्थयात्रेचा अनुभव अधिक आरामदायी करण्यासोबतच या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे, हा यामागचा उद्देश आहे.”

18 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
18 hrs ago
7c055ea2-6e39-4ac9-bcb0-517e62ba52d6

अनंत अंबानींचे वचन पूर्ण; रिलायन्स फाउंडेशनकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस • भाविकांचा प्रवास होणार अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक • ब्रह्मोत्सवाच्या काळात नव्या बस दाखल; स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही सज्ज तिरुमला, १६ सप्टेंबर २०२६: तिरुमलाला येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशनने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे २५ इलेक्ट्रिक बस सुपूर्द केल्या आहेत. या बससाठी स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या बसांना हिरवा झेंडा दाखवला. नव्या इलेक्ट्रिक बसांमुळे दरवर्षी तिरुमलाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल. तिरुमलामध्ये ब्रह्मोत्सवाचा उत्सव सुरू असून, यावेळी मोठ्या संख्येने भाविक तिरुमलाला येत असताना या बस सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जून २०२६ मध्ये तिरुमला दौऱ्यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस देण्याचे वचन दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत रिलायन्स फाउंडेशनने हे वचन पूर्ण केले आहे. या बससाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी Jio-bp ने तांत्रिक सहकार्य केले आहे. अनंत अंबानी म्हणाले, “दरवर्षी लाखो भाविक भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तिरुमलाला येतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी योगदान देणे हे आमच्यासाठी सौभाग्य आणि जबाबदारी दोन्ही आहे. या २५ इलेक्ट्रिक बस तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रयत्नांना आमचे छोटेसे योगदान आहे. तिरुमलेश्वराच्या तीर्थयात्रेचा अनुभव अधिक आरामदायी करण्यासोबतच या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे, हा यामागचा उद्देश आहे.”

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    4
    १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
१९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ
युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    user_हणमंत बिराप्पा कोळी
    हणमंत बिराप्पा कोळी
    News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड : खेडचे भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने खेडेकर यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
    1
    खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन
खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन
खेड : खेडचे भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली.
गणरायाच्या आगमनाने खेडेकर यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
    user_प्रतिनिधी : स्वाती हडकर
    प्रतिनिधी : स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    1
    दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    1
    शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न
आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"
    1
    "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    52 min ago
  • गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews
    1
    गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....!
पिंपरी-चिंचवड :
गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..!
हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे...
#PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ कृतज्ञता सदगुरुराया, तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली
    1
    डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ  
कृतज्ञता सदगुरुराया, 
तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    53 min ago
  • बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    1
    बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    1
    मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला
मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.