केळुणे दुहेरी हत्याकांड; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी केळुणे दुहेरी हत्याकांड; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी वयोवृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी नातू-नातसून न्यायालयात हजर; तपासाला वेग सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या नातू व नातसुनास गुरुवारी सुरगाणा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सखाराम गावित (६६) व त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही घरात झोपले असताना कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. या प्रकरणात पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित व नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत दाम्पत्याकडून दररोज मद्यपान करून शिवीगाळ व कटकट केली जात असल्याने त्याला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण, घटनेतील परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. गुरुवारी दोन्ही आरोपींना सुरगाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलिसांकडून या दुहेरी हत्याकांडाचा अधिक सखोल तपास करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे पुढील तपास करीत आहेत.
केळुणे दुहेरी हत्याकांड; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी केळुणे दुहेरी हत्याकांड; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी वयोवृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी नातू-नातसून न्यायालयात हजर; तपासाला वेग सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या नातू व नातसुनास गुरुवारी सुरगाणा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सखाराम गावित (६६) व त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही घरात झोपले असताना कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. या प्रकरणात पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित व नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत दाम्पत्याकडून दररोज मद्यपान करून शिवीगाळ व कटकट केली जात असल्याने त्याला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण, घटनेतील परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. गुरुवारी दोन्ही आरोपींना सुरगाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलिसांकडून या दुहेरी हत्याकांडाचा अधिक सखोल तपास करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे पुढील तपास करीत आहेत.
- मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक २६ ऑगस्ट २०२६ | नाशिक, (प्रतिनिधी : निलेश शेकोकार):- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक . २८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतीगृह या तीन भव्य इमारतींचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्हॅकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाराम वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत. नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट . नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. २००३ पासून कृषी शिक्षणाची वाटचाल नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक समाजाने दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले. १४ एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस चाचडगाव येथे तब्बल १४ एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व दहा विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. १०९ एकरांवर प्रात्यक्षिक शेती कृषी शिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. महाविद्यालयात चार वर्षांचा बी.एस्सी. कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे. ‘अ’ दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला. तसेच सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’तर्फे महाविद्यालयाला ‘कृषीभूषण-२०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘KRUSHITHON 2024’मध्ये महाविद्यालयाला ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे. संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक आणि ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले. मविप्र संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी : निलेश शेकोकार, नाशिक दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक : प्रा. डॉक्टर भागवत महाले2
- १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दर्शवला असून कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.4
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्-आयुक्त शेखर सिंह यांची पत्रकार परिषदेत माहिती *नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील. 29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन २९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील. दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल. भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले. आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत आणि विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची एक चांगली संधी आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसांचा आनंद घ्यावा.” कार्यक्रमाच्या पावित्र्याला सहकार्य करण्याचे आवाहन शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कार्यक्रमस्थळी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्थळ : ठक्कर डोम, नाशिक कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६ प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही “सिंहस्थ महाकुंभ मेळा"च्या तयारीमध्ये पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवाला देखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे.” - शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण.1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव लक्ष्मण बागुल गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे2
- मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.1