logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भावाच्या लग्नाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार भावाच्या लग्नाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार पुण्याकडे परतताना कार पलटी; तरुण वकील विराज जायभाय यांच्यासह सोनु डूचे यांचा दुर्दैवी अंत, एक जण गंभीर जखमी भावाच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून मित्रांसमवेत पुण्याकडे परतणाऱ्या तरुणांच्या कारला माहिजळगाव-नगर हायवेवरील आंबीलवाडी शिवारात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार चालकाला अवघड वळणाचा अंदाज न आल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला जाऊन शेतात घुसले आणि अनेक पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात जामखेड येथील अॅड. विराज जायभाय आणि सोनु डूचे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त तरुण हे लग्न समारंभ आटोपून पुण्याकडे निघाले होते. माहिजळगावजवळील आंबीलवाडी परिसरातील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली. मृतांपैकी अॅड. विराज जायभाय हे पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. ते जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ भगवान जायभाय यांचे पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनामुळे जामखेडसह विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही तरुणांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

5 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
5 hrs ago
9763ae53-5b65-4ab8-8de6-9da6e0c11c37

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड...200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त... जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड... घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथील शेतकऱ्याने आपली एक एकरातील मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली... एक एकरातील मोसंबीची 200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त...
    1
    जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड...200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त...
जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड...
घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथील शेतकऱ्याने आपली एक एकरातील मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली...
एक एकरातील मोसंबीची 200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त...
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    24 min ago
  • “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    1
    “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!”

मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.

विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.
विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू
ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!
    1
    आंदोलनाचा ११वा दिवस…  पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य!
ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी!
आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!
आंदोलनाचा ११वा दिवस…  पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य!
ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी!
आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
    1
    न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    23 hrs ago
  • फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,
    1
    फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 व्यावसायिक गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
    4
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 व्यावसायिक गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    1
    “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
“सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या बिडकीन बस स्थानकाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. छत नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत, कारण बसही स्थानकात न थांबता बाहेरून जात आहेत.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या बिडकीन बस स्थानकाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. छत नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत, कारण बसही स्थानकात न थांबता बाहेरून जात आहेत.
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.