logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाने युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देत बुलढाणा जिल्हा युवा आघाडीच्या अध्यक्षपदी आदित्य दाणे पाटील यांची नियुक्ती केली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले असून, त्यांच्यावर जिल्ह्यात संघटनेच्या विस्ताराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदित्य दाणे पाटील यांच्या या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेच्या कार्याला नवीन बळ मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माया देशमुख, महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या शिवशंभूप्रिया जांभळे, इतिहास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास वाबळे पाटील यांनी आदित्य दाणे पाटील यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, इतिहास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव, युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दीपक पवार, कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उत्तम बिरादर आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. रामकिशन शेळके यांनीही त्यांना अभिनंदन केले. यावेळी रुपेश दळवी, अभिजित खैरे, राम इढोळे यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आदित्य दाणे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या विस्तारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी 'संघटनेला बळकटी देणे, युवकांना सक्षम करणे आणि मराठा समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्यासाठी कार्य करणार' अशी भावना व्यक्त करण्यात आली. आदित्य दाणे पाटील यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात महासंघाच्या कार्याला एक नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळेल, अशी चर्चा संघटन वर्तुळात रंगली आहे.

1 hr ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
1 hr ago
e6d30ee6-c73c-4adb-b6f9-d0e906afbde9

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाने युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देत बुलढाणा जिल्हा युवा आघाडीच्या अध्यक्षपदी आदित्य दाणे पाटील यांची नियुक्ती केली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले असून, त्यांच्यावर जिल्ह्यात संघटनेच्या विस्ताराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदित्य दाणे पाटील यांच्या या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेच्या कार्याला नवीन बळ मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माया देशमुख, महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या शिवशंभूप्रिया जांभळे, इतिहास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास वाबळे पाटील यांनी आदित्य दाणे पाटील

3e99c848-ccf0-4ab4-a826-be4328794423

यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, इतिहास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव, युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दीपक पवार, कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उत्तम बिरादर आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. रामकिशन शेळके यांनीही त्यांना अभिनंदन केले. यावेळी रुपेश दळवी, अभिजित खैरे, राम इढोळे यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आदित्य दाणे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या विस्तारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी 'संघटनेला बळकटी देणे, युवकांना सक्षम करणे आणि मराठा समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्यासाठी कार्य करणार' अशी भावना व्यक्त करण्यात आली. आदित्य दाणे पाटील यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात महासंघाच्या कार्याला एक नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळेल, अशी चर्चा संघटन वर्तुळात रंगली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील एका हनुमान मंदिराच्या हॉलचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेवेळी मंदिर परिसरात अनेक भाविक उपस्थित होते, ज्यामुळे अनेक जण जखमी झाले. जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि अफरा-तफरीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
    1
    महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील एका हनुमान मंदिराच्या हॉलचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेवेळी मंदिर परिसरात अनेक भाविक उपस्थित होते, ज्यामुळे अनेक जण जखमी झाले.

जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि अफरा-तफरीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    1
    अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.
    2
    २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत.

या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • आज, २१ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली आणि खामगाव या तीन तालुक्यांमधील एकूण १२ केंद्रांवर नीट (NEET) परीक्षेची पुनरावृत्ती (Re-test) शांततेत पार पडली. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, ज्यामुळे कोणताही गैरप्रकार टाळता यावा आणि कायदे-सुव्यवस्था राखली जावी. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाने विशेष रणनीती आखली होती, ज्या अंतर्गत अत्यंत कडक सुरक्षा उपाय योजण्यात आले. सुरक्षेच्या तयारीची खात्री करण्यासाठी कालच सर्व केंद्रांवर मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली होती. खामगाव शहरातील जे.बी. मेहता, अंजुमन हायस्कूल आणि नॅशनल हायस्कूल या तीन प्रमुख परीक्षा केंद्रांवर १०८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश करताना केवळ ओळखपत्र आणि पाण्याची बाटली सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती, तर इतर कोणत्याही वस्तूंना कडक मनाई करण्यात आली होती. दरम्यान, मागील परीक्षेचा मानसिक ताण सहन केल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याने पालकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. खबरदारी म्हणून, परीक्षा परिसरातील झेरॉक्स सेंटर आणि सायबर कॅफे देखील बंद ठेवण्यात आले होते.
    1
    आज, २१ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली आणि खामगाव या तीन तालुक्यांमधील एकूण १२ केंद्रांवर नीट (NEET) परीक्षेची पुनरावृत्ती (Re-test) शांततेत पार पडली. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, ज्यामुळे कोणताही गैरप्रकार टाळता यावा आणि कायदे-सुव्यवस्था राखली जावी.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाने विशेष रणनीती आखली होती, ज्या अंतर्गत अत्यंत कडक सुरक्षा उपाय योजण्यात आले. सुरक्षेच्या तयारीची खात्री करण्यासाठी कालच सर्व केंद्रांवर मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली होती. खामगाव शहरातील जे.बी. मेहता, अंजुमन हायस्कूल आणि नॅशनल हायस्कूल या तीन प्रमुख परीक्षा केंद्रांवर १०८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश करताना केवळ ओळखपत्र आणि पाण्याची बाटली सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती, तर इतर कोणत्याही वस्तूंना कडक मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, मागील परीक्षेचा मानसिक ताण सहन केल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याने पालकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. खबरदारी म्हणून, परीक्षा परिसरातील झेरॉक्स सेंटर आणि सायबर कॅफे देखील बंद ठेवण्यात आले होते.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 min ago
  • मंत्रालयात सुरू असलेल्या उपोषणाच्या दणक्यामुळे अखेर एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे उपोषणकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे.
    1
    मंत्रालयात सुरू असलेल्या उपोषणाच्या दणक्यामुळे अखेर एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे उपोषणकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे.
    user_ZM news official
    ZM news official
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दामिनी पथक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि टवाळखोरांना योग्य धडा शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असते.
    1
    दामिनी पथक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि टवाळखोरांना योग्य धडा शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असते.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    Salesperson चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    1
    पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर तीव्र हल्ला चढवला आहे.
    1
    खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर तीव्र हल्ला चढवला आहे.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आज संत गजानन महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. यंदा या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, सुमारे ७०० वारकरी ही दिंडी घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. पालखीला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच शेगावात हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पंढरपूरमधील आषाढी महोत्सवात संत गजानन महाराजांच्या पालखीला विशेष मानाचे स्थान दिले जाते. आषाढीचा सोहळा अनुभवण्यासाठी हे सर्व वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, शेगावच्या या पालखीमध्ये नेहमीच हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडत असते आणि अशाच एका मुस्लिम वारकऱ्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे.
    1
    आज संत गजानन महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. यंदा या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, सुमारे ७०० वारकरी ही दिंडी घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. पालखीला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच शेगावात हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पंढरपूरमधील आषाढी महोत्सवात संत गजानन महाराजांच्या पालखीला विशेष मानाचे स्थान दिले जाते. आषाढीचा सोहळा अनुभवण्यासाठी हे सर्व वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, शेगावच्या या पालखीमध्ये नेहमीच हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडत असते आणि अशाच एका मुस्लिम वारकऱ्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.