विज्ञान-आश्रमच्या दोन दिवशीय प्रदर्शनाला ११५ शाळांचे १४ हजार विद्यार्थी : दोघांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान विज्ञान-आश्रमच्या दोन दिवशीय प्रदर्शनाला ११५ शाळांचे १४ हजार विद्यार्थी : दोघांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान शिक्रापूर : थोर शास्त्रज्ञ तथा विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ.एस.एस.कलबाग यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील विज्ञान आश्रममधील संशोधनांवर आधारीत १५५ यशस्वी प्रयोगांच्या जाहीर दोन दिवशीय प्रदर्शनाला यावर्षी राज्यभरातील ११५ शाळांतील सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. दरवर्षी याच दिवशी डॉ.कलबाग यांच्याच नावाने दिला जाणारा या वर्षीचा युवा उद्योजक पुरस्कार तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील जयेश धायरकर याला तर युवा संशोधक म्हणून वेळापूर (जि.सोलापूर) येथील अक्षय सावंत यांना जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, मुख्य संचालक डॉ.योगेश कुलकर्णी, अशोक कलबाग व डॉ.अरुण दिक्षित यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. शाळाबाह्य मुलांसह अल्पशिक्षित व नापासांसाठी गावातच उद्योगसंधी देण्याच्या प्रमुख उद्देशांनी स्व.कलबाग यांनी सन १९७९ मध्ये पाबळ (ता.शिरूर) येथे येवून विज्ञान आश्रमची सुरवात करुन ग्रामिण पदविका अभ्यासक्रम सुरू केला. या त्यांच्या प्रयोगाने संपूर्ण राज्यभरासह इतर राज्यांमध्ये चार हजारांपेक्षा जास्त उद्योजक घडलेत. यातीलच गुणवंत युवा उद्योजकांना पुरस्कार देण्याचा प्रघात डॉ.कलबाग यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दिवंगत मिरा आम्मा कलबाग यांनी सन २००३ पासून सुरू केला. जयेश धायरकर याने जे.डी.फार्म नावाने दिड एकरातील पॉलिहाऊस उभे केले असून अक्षय सावंत याने अक्षय कंपोस्टर म्हणून जागतिक दर्जाच्या ब्रॅंडसह कंपोस्ट खताची निर्मिती याने केली आहे. कार्यक्रमाला वरील मान्यवरांसह विज्ञान आश्रमचे संचालक रणजित शानबाग, सरपंच सोपान जाधव,सचिन वाबळे, कैलास जाधव, राहूल जगताप, विशाल जाधव, लक्ष्मण जाधव, रेष्मा हवालदार, प्रियंका जाधव, भानुदास दौंडकर, अर्चना कुलकर्णी, प्रियंका चौधरी, भक्ती तळवलकर आदींसह परिसरातील ११० शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तब्बल दोन तास थांबून संपूर्ण प्रदर्शन पाहिल्याचे तसेच यावर्षी तब्बल ११५ शाळांमधील सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांनी या दोन दिवसांच्या प्रदर्शनाला भेटी दिल्याचे विज्ञान आश्रमचे वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने यावे असे प्रदर्शन : शिवाजीराव आढळराव पाटील (मा.खासदार तथा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ, लांडेवाडी, ता.आंबेगाव) आमच्या सर्व मराठी-इंग्रजी माध्यमासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी या प्रदर्शनाला आवर्जून पाठवितो. यावर्षी चार मोठ्या बसेस भरुन विद्यार्थी पाबळ येथे येवू गेले. विद्यार्थ्यांची विज्ञानवृत्ती वृध्दींगत होण्यासाठी आणि रोजगाराभिमुख व्यवसाय संधींची द्रुष्टी विकसीत होण्यासाठी हे प्रदर्शन खुपच पथदर्शी असल्याचा आमचा अनुभव आहे. लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पाबळ (ता.शिरूर) येथील विज्ञान आश्रममध्ये भेटी दिल्या व मोठ्या कुतुहलाने अनेक प्रयोगांची माहिती घेतली. प्रतिनिधी :- बाबा इनामदार पुणे ग्रामीण

- मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..1
- Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam1
- आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।1
- फर्जी सरकारी लेटरहेड, नकली हस्ताक्षर और 70 लाख की ठगी... ठाणे क्राइम ब्रांच का बड़ा खुलासा!1
- सपा कलवा मुंब्रा अध्यक्ष शब्बीर खान ने जंतरमंतर पर छात्रों के आंदोलन और SIR को लेकर क्या कहा ?1
- mumbai ke pizza hutt me mila customer ko baal staff kar raha hai bahes video viral1
- मुम्ब्रा के शिमला पार्क पर शुरू हुआ नया ट्रैफिक सिग्नल! स्थानीय युवक शानावाज खान ने दी जानकारी...!1
- फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़, 32 लोग हिरासत में || aapka prahar times वाराणसी में फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़, 32 लोग हिरासत में उत्तर प्रदेश के वाराणसी में पुलिस ने एक बड़े फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़ किया है। पुलिस की छापेमारी के दौरान इस चार मंजिला इमारत से 21 युवतियां और 11 युवक मिले। जांच में सामने आया कि यह गिरोह ऑनलाइन ट्रेडिंग, निवेश और डिजिटल मार्केटिंग के नाम पर देश ही नहीं बल्कि विदेशों में भी लोगों को ठग रहा था। आरोपी खुद को नामी बहुराष्ट्रीय कंपनियों का एजेंट बताकर लोगों का भरोसा जीतते थे और फिर उन्हें मोटे मुनाफे का लालच देकर लाखों रुपये की ठगी करते थे। पुलिस ने मौके से कई आरोपियों को गिरफ्तार किया है। छापेमारी के दौरान कंप्यूटर, लैपटॉप, मोबाइल फोन, महत्वपूर्ण दस्तावेज और डिजिटल डेटा भी जब्त किया गया है। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि इस गिरोह ने अब तक कितने लोगों को अपना शिकार बनाया और ठगी की रकम कितनी है। फिलहाल मामले की जांच जारी है और पुलिस इस फर्जी नेटवर्क से जुड़े अन्य लोगों की तलाश कर रही है।1