logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पत्नी न्यायाधीश, आता पतीही न्यायासनावर; सोलापूरच्या प्रथमेश शिंदेंचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २०२३ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील सुपुत्र प्रथमेश रमेश शिंदे यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. सन २०१७ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण करताना प्रथमेश यांनी सोलापूर विद्यापीठातून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर एल.एल.एम. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत पहिल्याच प्रयत्नात विधी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केली. यासोबतच समाजकार्य विषयातही त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. वकिली करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळाल्याने न्यायाधीश होण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले. तिसऱ्यांदा मुलाखतीपर्यंत पोहोचत अखेर त्यांनी हे यश मिळवले. यापूर्वी एकदा वेटिंग लिस्टमध्येही नाव आले होते, मात्र खचून न जाता त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. “निकालात नाव पाहणे आनंदाचा क्षण होता, पण राज्यात दुसरा क्रमांक मिळणे हा सुखद धक्का होता,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे प्रथमेश यांच्या पत्नी सौ. मोनाली प्रथमेश शिंदे या देखील २०२१ मध्ये याच परीक्षेत यशस्वी होऊन सध्या न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘न्यायाधीश दांपत्य’ म्हणून या कुटुंबाची विशेष ओळख निर्माण झाली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी मोनाली तसेच मार्गदर्शक गणेश पवार आणि अॅड. गणेश शिरसाट यांना दिले.

6 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
56505a60-cb89-4037-a479-2990a12549cb

पत्नी न्यायाधीश, आता पतीही न्यायासनावर; सोलापूरच्या प्रथमेश शिंदेंचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २०२३ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील सुपुत्र प्रथमेश रमेश शिंदे यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. सन २०१७ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण करताना प्रथमेश यांनी सोलापूर विद्यापीठातून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर एल.एल.एम. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत पहिल्याच प्रयत्नात विधी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केली. यासोबतच समाजकार्य विषयातही त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. वकिली करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळाल्याने न्यायाधीश होण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले. तिसऱ्यांदा मुलाखतीपर्यंत पोहोचत अखेर त्यांनी हे यश मिळवले. यापूर्वी एकदा वेटिंग लिस्टमध्येही नाव आले होते, मात्र खचून न जाता त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. “निकालात नाव पाहणे आनंदाचा क्षण होता, पण राज्यात दुसरा क्रमांक मिळणे हा सुखद धक्का होता,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे प्रथमेश यांच्या पत्नी सौ. मोनाली प्रथमेश शिंदे या देखील २०२१ मध्ये याच परीक्षेत यशस्वी होऊन सध्या न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘न्यायाधीश दांपत्य’ म्हणून या कुटुंबाची विशेष ओळख निर्माण झाली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी मोनाली तसेच मार्गदर्शक गणेश पवार आणि अॅड. गणेश शिरसाट यांना दिले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • फ्रूट अक्कलकोट तालुक्यातील जेऊर फळांचे कीटक, रोग आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करताना दर्जाही टिकवून ठेवणाऱ्या फ्रूट कव्हर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जेऊर येथील शेतकरी राजा चौगुले यांनी आपल्या केशर आंबा बागेत केला आहे. प्रत्येक आंब्याला कागदी फ्रूट कव्हर लावल्याने त्यांच्या १२०० झाडांच्या सेंद्रिय बागेची विशेष चर्चा होत आहे. राजा चौगुले आणि रुक्मिणी चौगुले या दाम्पत्याने ऊस शेतीऐवजी दोन एकर क्षेत्रावर घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. कोकणातून रोपे आणून आधुनिक पद्धतीने उभारलेली ही बाग आता पूर्ण बहरात आली आहे. या बागेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावरील प्रत्येक फळाला दोन पदरी कागदी फ्रूट कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाहीत, नैसर्गिक कव्हरमुळे फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा नैसर्गिक, उठावदार रंग विकसित होतो. फळे कव्हरमध्ये सुरक्षित असल्याने बाहेरील कीटकनाशकांची फवारणी कमी करावी लागते. त्यामुळे फळे विषमुक्त तयार होतात. घनदाट लागवडीमुळे उत्पादन थोडे कमी होते; मात्र वादळात कोणतेही नुकसान होत नाही.
    1
    फ्रूट 
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर फळांचे कीटक, रोग आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करताना दर्जाही टिकवून ठेवणाऱ्या फ्रूट कव्हर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जेऊर येथील शेतकरी राजा चौगुले यांनी आपल्या केशर आंबा बागेत केला आहे. प्रत्येक आंब्याला कागदी फ्रूट कव्हर लावल्याने त्यांच्या १२०० झाडांच्या सेंद्रिय बागेची विशेष चर्चा होत आहे.
राजा चौगुले आणि रुक्मिणी चौगुले या दाम्पत्याने ऊस शेतीऐवजी दोन एकर क्षेत्रावर घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. कोकणातून रोपे आणून आधुनिक पद्धतीने उभारलेली ही बाग आता पूर्ण बहरात आली आहे.
या बागेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावरील प्रत्येक फळाला दोन पदरी कागदी फ्रूट कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाहीत, नैसर्गिक कव्हरमुळे फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा नैसर्गिक, उठावदार रंग विकसित होतो. फळे कव्हरमध्ये सुरक्षित असल्याने बाहेरील कीटकनाशकांची फवारणी कमी करावी लागते. त्यामुळे फळे विषमुक्त तयार होतात. घनदाट लागवडीमुळे उत्पादन थोडे कमी होते; मात्र वादळात कोणतेही नुकसान होत नाही.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बेंगलुरु में भारी बारिश और ओलावृष्टि: #primenews83 #breakingnews #hindinews #BengaluruRain #Hailstorm #HeavyRainfall #WeatherAlert #RainChaos #TrafficJam #CityDisruption
    1
    बेंगलुरु में भारी बारिश और ओलावृष्टि:
#primenews83 #breakingnews #hindinews 
#BengaluruRain #Hailstorm #HeavyRainfall #WeatherAlert #RainChaos #TrafficJam #CityDisruption
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    1
    *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    1
    अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. �
Hindustan Times
ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत.
येथे महिलांना:
🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा
💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी
📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा
👉 मुख्य उद्देश:
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे.
📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ
सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे:
ओळख (Identity) + विकास केंद्र
समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन
✔️ थोडक्यात
अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते
वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात
पण मुख्य हेतू एकच —
👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    1
    लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी.
निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. 
लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे
ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि
लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे
व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या
विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    1
    लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.