logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्धा नदीच्या फुगवट्यामुळे चंद्रपूर शहरात शिरले पुराचे पाणी; ५० हून अधिक घरे बाधित, चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग बंद चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने चंद्रपूर शहरासह वाहतुकीला पुराचा मोठा फटका बसला आहे. वर्धा नदी फुगल्यामुळे तिच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट नदीतील पाणी मागे फिरल्याने (बॅक वॉटर) चंद्रपूर शहरातील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा जोडणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शहरात 'बॅक वॉटर'चा फटका; ५० हून अधिक घरांत शिरले पाणी वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरल्याने झरपट आणि इरई नदीचे पाणी पुढे न जाता शहराच्या दिशेने मागे फिरले आहे. यामुळे आज पहाटेपासूनच चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. विशेषतः भिवापूर भागातील सुमारे ५० हून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली. मनपा व प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई वेगाने सुरू केली आहे. बॅक वॉटरची पातळी वाढत असल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. वर्धा नदीचा पूल पाण्याखाली; दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक ठप्प दरम्यान, वर्धा नदीने पात्र सोडल्याने चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा आणि दक्षिण भारताला जोडणारा वर्धा नदीचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे २ फूट पुराचे पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काल रात्रीपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला तेलंगणा व दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, नदीची पाणी पातळी ओसरेपर्यंत हा मार्ग बंदच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

1 hr ago
user_News34
News34
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
1 hr ago

वर्धा नदीच्या फुगवट्यामुळे चंद्रपूर शहरात शिरले पुराचे पाणी; ५० हून अधिक घरे बाधित, चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग बंद चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने चंद्रपूर शहरासह वाहतुकीला पुराचा मोठा फटका बसला आहे. वर्धा नदी फुगल्यामुळे तिच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट नदीतील पाणी मागे फिरल्याने (बॅक वॉटर) चंद्रपूर शहरातील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा जोडणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शहरात 'बॅक वॉटर'चा फटका; ५० हून अधिक घरांत शिरले पाणी वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरल्याने झरपट आणि इरई नदीचे पाणी पुढे न जाता शहराच्या दिशेने मागे फिरले आहे. यामुळे आज पहाटेपासूनच चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. विशेषतः भिवापूर भागातील सुमारे ५० हून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली. मनपा व प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई वेगाने सुरू केली आहे. बॅक वॉटरची पातळी वाढत असल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. वर्धा नदीचा पूल पाण्याखाली; दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक ठप्प दरम्यान, वर्धा नदीने पात्र सोडल्याने चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा आणि दक्षिण भारताला जोडणारा वर्धा नदीचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे २ फूट पुराचे पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काल रात्रीपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला तेलंगणा व दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, नदीची पाणी पातळी ओसरेपर्यंत हा मार्ग बंदच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले
    1
    वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा
वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम
माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते 
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    1
    NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,,
आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    8 min ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 min ago
  • बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"
    1
    बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    1
    विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर वर्धा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.
    1
    वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर
वर्धा
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
    1
    देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी 
आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले.
या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.