लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू तसेच थोर विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या नावाने विद्यापीठात 'अध्यासन केंद्र' स्थापन करण्यात यावे, तसेच विद्यापीठाच्या लातूर येथील उपकेंद्रात त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार रोहितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन देताना लातूर येथून ॲड. निशांत वाघमारे आणि संजय शेटे उपस्थित होते. राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. जनार्दन वाघमारे सरांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. डॉ. वाघमारे हे केवळ विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरूच नव्हते, तर मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, शिक्षण, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. मराठवाड्यासारख्या भागातील उच्च शिक्षणाचा पाया त्यांनी मजबूत केला. ग्रामीण आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले दूरदर्शी आणि पुरोगामी शैक्षणिक नेतृत्व कायम स्मरणात राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अफाट आहे. त्यांचे वैचारिक मार्गदर्शन आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या उद्देशाने त्यांच्या स्मरणार्थ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'डॉ. जनार्दन वाघमारे अध्यासन केंद्र' तातडीने स्थापन करावे व याबाबत सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती आ. रोहित पवार यांनी केली आहे. अध्यासन केंद्रासोबतच, डॉ. वाघमारे यांच्या कार्याचा गौरव म्हणून विद्यापीठाच्या लातूर येथील उपकेंद्रात त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी विशेष मागणीही यावेळी करण्यात आली. या महत्त्वाच्या मागणीच्या वेळी लातूरचे प्रतिनिधी म्हणून ॲड. निशांत वाघमारे आणि संजय शेटे हे समवेत उपस्थितीत होते.

- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by नागनाथ ससाने1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- Post by Ramesh Mulgir1
- लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.1