स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी ; धाराशिव जिल्ह्यातील विचारमंचकडून हृदयस्पर्शी कौतुक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी उचलले ऐतिहासिक पाऊल धाराशिव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच कडून आ. मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता विशेष प्रतिनिधी मुंबई - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच विधानसभेत केली. ही मागणी अत्यंत ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेमी दृष्टिकोनातून केली गेलेली आहे. या मागणीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू होईल, याबद्दल धाराशिव जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंचचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी पत्र लिहून आ.मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहे.* स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बलिदानाचे महत्त्व सांगणारा प्रत्येक पाऊल राष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक अमूल्य ठेवा आहे. आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या या मागणीमुळे सावरकरप्रेमी जनतेमध्ये विश्वास आणि आदर वाढला आहे. आ. मुनगंटीवार यांच्या या ऐतिहासिक पावलाला आम्ही एक आदर्श म्हणून स्वीकारतो, असे मकरंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच, कळंब (जिल्हा धाराशिव) कडून आम्ही आ. मुनगंटीवार यांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्याचे स्वागत करत, त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कळंब येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करतो. यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कळंब येथील कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांची उपस्थिती आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरेल, असे भावनिक उद्गार पाटील यांनी काढले आहे.

- मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका. नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.1
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- Post by JKV NEWS 241
- विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कमी करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. शासकीय नोकर भरती प्रक्रियेत वाढलेल्या शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क किमान ५० टक्के कमी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच समाजातील सर्व घटकांतील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी यासाठी शुल्क सवलत आणि इतर आर्थिक सहाय्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परीक्षा केंद्रांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने बस व रेल्वे प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी मागणीही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासाठी ‘एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ उपक्रम राबवण्याची सूचना करत CSR निधीचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सव्वा दोन लाख रिक्त पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडणे आणि किचकट प्रक्रिया याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षांचे पाच वर्षांचे पूर्वनियोजित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली असून यावर मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इतर राज्ये व केंद्र सरकारच्या परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.1