Shuru
Apke Nagar Ki App…
खामगावात घरफोडीचा पर्दाफाश; अमरावतीतील महिलेला अटक, सव्वादोन लाखांचे दागिने जप्त
Sachin boharpi
खामगावात घरफोडीचा पर्दाफाश; अमरावतीतील महिलेला अटक, सव्वादोन लाखांचे दागिने जप्त
More news from महाराष्ट्र and nearby areas
- रोहणा : येथील जि.प. हायस्कूल शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात 'जागतिक महिला दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापिका सौ. पुष्पा कोळी यांनी आपले विचार व्यक्त केले स्त्री ही केवळ घराची नाही तर समाजाचीही शक्ती आहे. आजच्या वैज्ञानिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे.अशा काही रोहणा पंचक्रोशीतील कर्तुत्वान महिलांचा या शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने "जागतिक महीला दिनी" महिलांचा साडी ,चोळी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गिताने महिलांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सरपंच सविता ताई गव्हाळे , दिवठाणा सरपंच सौ.हेलोडेताई, वर्णा सरपंच सौ.संगीताताई राणा, निमकोहळा सरपंच सौ. राठोडताई,कोंन्टी सरपंच सौ. इंगळेताई, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांचे साडी,चोळी व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सौ.पुष्पा कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच. शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या माता पालक संघअध्यक्षा अर्चनाताई टाले आणि शाळेच्या गेटसाठी भरीव निधी देणाऱ्या सौ. लिलाबाई लक्ष्मण आमले यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एन,एम, एम,एस परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल ७ विद्यार्थी व त्यांच्या आईंचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद सर्वश्री- राणे, निकस, जाधव, सावळे,चव्हाण, धुरंधर,खेळकर, हिवराळे, कळमकर,गर्गे,सौ. तेलगोटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन दीपक शेजुळसर यांनी केले.4
- या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आमदार Bacchu Kadu यांना फोन करून संवाद साधल्याचे दिसत आहे. या संभाषणात शिंदे यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, “तुमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,” अशी दखल त्यांनी घेतल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. दरम्यान हा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- चिखलीत न्याय मिळेना! लेकीच्या आत्महत्येला जबाबदार आरोपी मोकाट; पित्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..! बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीने लग्नाचे आमिष आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, मात्र दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत, आता पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. हे पत्र आहे एका हतबल पित्याचं, ज्याने आपल्या लेकीला गमावलं आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पाटोदा येथील तन्मय विजय गवई हा जबाबदार असल्याचा आरोप तिचे वडील रामदास दामोदर सरकटे यांनी केला आहे. आरोपी तन्मय गवई याने रुपालीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र, महावितरणमध्ये नोकरी लागताच त्याने रुपालीला लग्नास नकार दिला. वारंवार होणारा मानसिक त्रास आणि फसवणुकीमुळे खचलेल्या रुपालीने अखेर मृत्यूला कवटाळले. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, ४५ दिवस उलटूनही चिखली पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून, पोलीस विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खळबळजनक दावा या निवेदनात करण्यात आला आहे. न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सरकटे कुटुंबीयांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ०६ मार्च २०२६ पासून पीडितेचे वडील आणि इतर नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आमरण उपोषणाला' बसले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे आरोपी दीड-दीड महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असतात. आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची काय दखल घेतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.1
- कापसाच्या भावात वाढ न झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल.1
- आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन1
- Post by Raghunath Aghao1
- Post by Sharad Dayedar1
- जळगाव शहरात अवैध शस्त्रांच्या विक्रीवर लगाम घालत जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सहा गावठी पिस्तुल, दहा जिवंत काडतुसे आणि एक होंडा युनिकॉर्न दुचाकी असा सुमारे तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक 44/2026 नुसार शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यश रामदास नमदेव याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरच्या चौकशीत अवैध शस्त्र विक्रीच्या साखळीबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी केतन भालेराव, गौरव साळुंखे, समाधान निकम, विकास काकडे, जगदीश महाजन आणि कैलास माळी यांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, तपासादरम्यान काही आरोपींवर इतर पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.1