सायबर फसवणुकीपासून सावध; संशयास्पद कॉलवर विश्वास ठेवू नका.. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः **‘डिजिटल अरेस्ट’**च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने कोणत्याही संशयास्पद फोन कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने आलेल्या धमकीच्या फोन कॉलवर विश्वास ठेवू नये. अशा कॉलद्वारे नागरिकांना घाबरवून आर्थिक व्यवहार करण्यास किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या कॉलला प्रतिसाद देताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. फसवणुकीनंतरचा सुरुवातीचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, या ‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार केल्यास आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करता येऊ शकते. तसेच नागरिकांनी ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद व्यक्तीच्या सांगण्यावरून आर्थिक व्यवहार करणे टाळावे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही घाई न करता संबंधित अधिकृत यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सायबर फसवणुकीपासून सावध; संशयास्पद कॉलवर विश्वास ठेवू नका.. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः **‘डिजिटल अरेस्ट’**च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने कोणत्याही संशयास्पद फोन कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने आलेल्या धमकीच्या फोन कॉलवर विश्वास ठेवू नये. अशा कॉलद्वारे नागरिकांना घाबरवून आर्थिक व्यवहार करण्यास किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या कॉलला प्रतिसाद देताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. फसवणुकीनंतरचा सुरुवातीचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, या ‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार केल्यास आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करता येऊ शकते. तसेच नागरिकांनी ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद व्यक्तीच्या सांगण्यावरून आर्थिक व्यवहार करणे टाळावे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही घाई न करता संबंधित अधिकृत यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस1
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो1
- 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.1
- *ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुजीब भाई मित्र मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम* नांदेड शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून येत होता. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुजीब भाई मित्र मंडळाने शहरातील मुख्य चौकात सेवा उपक्रमाला सुरुवात केली. मानवतेचा संदेश देण्यासाठी मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने पाणी बॉटल, बुंदीचे लाडू आणि पार्ले बिस्किटाचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता आलेल्या प्रत्येक भाविकाला थंड पाण्याची बॉटल आणि प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात आला, तर लहान मुलांना आवडीने पार्ले बिस्कीट वाटण्यात आले. मुजीब भाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिवसभर स्वतः उभे राहून हे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांततेत आणि सेवाभावाने सण साजरा करून मुजीब भाई मित्र मंडळाने पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आदर्श जपला आहे.1