logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औंढा नागनाथसह नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजूरी आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटी मंजूर मुंबई, दि. २७ : औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली. औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली. कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

3 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
3 hrs ago
f9dc13a7-d78d-41b6-90d7-840cbf89e8a1

More news from Hingoli and nearby areas
  • वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    11 hrs ago
  • 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    1
    🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!

शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾

“आपली जमीन, आपला हक्क!”

🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!
शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾
“आपली जमीन, आपला हक्क!”
शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪
#खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून  4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
    1
    गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल
कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून  4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    1
    बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय  म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील
हृदया दीपक शेठ पाटील  हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    user_Vishnu shirame
    Vishnu shirame
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    1
    शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी
    1
    प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes
    1
    🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८००
या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.