logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वरवटी येथे मंदिरासमोर शेतकऱ्याला लुटले; पोलिसांत गुन्हा दाखल अंबाजोगाई/क्राईम रिपोर्टर: तालुक्यातील वरवटी येथे मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर थांबलेल्या एका शेतकऱ्याला धमकावून त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरवटी येथील शेतकरी गोविंद मुंजाजी मुंडे (वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती) हे दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:०० ते ८:३० वाजेच्या सुमारास गावातील मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी गावातीलच आरोपी मारुती (उर्फ) हनुमंत चाटे याने फिर्यादी गोविंद मुंडे यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. मुंडे यांनी 'माझ्याजवळ पैसे नाहीत' असे सांगताच, आरोपीने जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ७,००० रुपये रोख काढून घेतले. फिर्यादीने सदरचे पैसे परत मागितले असता आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी गोविंद मुंडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मारुती चाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) चौधरी करत आहेत.

37 min ago
user_Beed News Express
Beed News Express
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
37 min ago
469721b8-3a35-4f25-98c0-9d5102bd73f2

वरवटी येथे मंदिरासमोर शेतकऱ्याला लुटले; पोलिसांत गुन्हा दाखल अंबाजोगाई/क्राईम रिपोर्टर: तालुक्यातील वरवटी येथे मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर थांबलेल्या एका शेतकऱ्याला धमकावून त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरवटी येथील शेतकरी गोविंद मुंजाजी मुंडे (वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती) हे दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:०० ते ८:३० वाजेच्या सुमारास गावातील मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी गावातीलच आरोपी मारुती (उर्फ) हनुमंत चाटे याने फिर्यादी गोविंद मुंडे यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. मुंडे यांनी 'माझ्याजवळ पैसे नाहीत' असे सांगताच, आरोपीने जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ७,००० रुपये रोख काढून घेतले. फिर्यादीने सदरचे पैसे परत मागितले असता आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी गोविंद मुंडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मारुती चाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) चौधरी करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    1
    केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न.
विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार.
लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित
या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले.
महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लातूर : बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अ‍ॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन
लातूर :  बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 
या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अ‍ॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_अतिश कांबळे
    अतिश कांबळे
    Local News Reporter Latur, Maharashtra•
    22 hrs ago
  • शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करून प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मगर व पदाधिकारी शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुप्टाच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सध्या असलेली ३० विद्यार्थ्यांची बॅच रद्द करून पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची बॅच कायम ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक तसेच सातवा वेतन आयोग फरक यांचा समावेश आहे. शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रलंबित संचिका तात्काळ मंजूर कराव्यात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडीच्या शिफारस प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करून नियमित कपात सुरू करावी. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पाचवा हप्ता रोखीने द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची जीपीएफ खाते स्लिप वितरित करून जीपीएफ खाती ऑनलाइन करण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय प्रचलित अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर आणि जिल्हासचिव शशिकांत जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अन्यथा लवकरच छत्रपती संभाजीनगर कारल्या बाहेर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
    2
    शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने

माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर 

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने
माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर 
बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करून प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मगर  व पदाधिकारी शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुप्टाच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सध्या असलेली ३० विद्यार्थ्यांची बॅच रद्द करून पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची बॅच कायम ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक तसेच सातवा वेतन आयोग फरक यांचा समावेश आहे.
शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रलंबित संचिका तात्काळ मंजूर कराव्यात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडीच्या शिफारस प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करून नियमित कपात सुरू करावी. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पाचवा हप्ता रोखीने द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची जीपीएफ खाते स्लिप वितरित करून जीपीएफ खाती ऑनलाइन करण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याशिवाय प्रचलित अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर आणि जिल्हासचिव शशिकांत जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अन्यथा लवकरच छत्रपती संभाजीनगर कारल्या बाहेर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    43 min ago
  • Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
    1
    Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
    user_Ramprasad Gaikwad
    Ramprasad Gaikwad
    Lawyer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!
    1
    नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी बीड : एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करत संबंधित प्रकरणातील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार हे समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, सत्य परिस्थिती उजेडात आणताना पत्रकारांवर दबाव अथवा पोलिस कारवाई होणे ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणारी असल्याचे निदर्शकांनी म्हटले. यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पत्रकार मंदार गोंजरी यांच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी केली. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. पत्रकारांवरील कारवाईचा निषेध करत निदर्शकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    1
    पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी

पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी
बीड : एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करत संबंधित प्रकरणातील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार हे समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, सत्य परिस्थिती उजेडात आणताना पत्रकारांवर दबाव अथवा पोलिस कारवाई होणे ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणारी असल्याचे निदर्शकांनी म्हटले.
यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पत्रकार मंदार गोंजरी यांच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी केली. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
पत्रकारांवरील कारवाईचा निषेध करत निदर्शकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ; महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
    1
    🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ;   महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता
🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ 
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १००  हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.