लाडकी बहिण योजना दिलासा देणारी, गोरगरीब महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा - अर्जुन पाडेवार परतूर, दि.२ - राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गोर गरीब महिलांना मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी पुढाकार मोठा पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महिलांची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन करताना महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य ते पुरावे जमवण्याचे आवाहन केले. शहरातील डॉ.आंबेडकरनगर, पंजेतन गल्ली तसेच इंदिरानगरमधील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पाडेवार यांनी सांगितले.राज्य सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु अनेक महिलांना या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नाही. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती बैठकीत दिली. यावेळी अंगणवाडी सेविका तस्लिम पठाण, सविता जईद, राधा बिनगे, यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी .शहरात सर्वत्र भोंगा फिरवून या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती दिली आहे.गोरगरीब महिलांना सरकारच्या या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी योजनेविषयी बोलतांना सांगितले.

- *वर्ग 10 वी उत्तीर्ण व वर्ग 11 वी ला प्रवेश घेतलेल्या आणि वर्ग 12 वी उत्तीर्ण आणि पदवी प्रथमवर्ष ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी... ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा ची तयारी करायची आहे त्यांच्या साठी स्पर्धा परीक्षा गणित व बुद्धिमत्ता क्लासेस सुरु... वेळ दररोज सायंकाळी 04 : 00 ते रात्री 08 : 00* *गायकवाड करियर अकॅडमी* ( ~इतर फक्त शिकवितात... आम्ही थेट नोकरीलाच लावतो~ ) जायकवाडी वसाहत, पोलीस कॉलनी जवळ, आष्टी ता. परतूर जि. जालना 9421326818 & 94213268681
- *परतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची 12 #जुलै च्या #मनोजजरांगेपाटील यांच्या नेतृत्वात पार पाडणाऱ्या #महाशांतता #रॅलीचा प्रचार व प्रसार करण्याकरिता #प्रचाररथ तयार..*1
- आज मुंबई येथे मा.आ.आदरणीय #सुरेशकुमारजी_जेथलिया_साहेब यांनी महाविकास आघाडी चे नेते उध्दवजी ठाकरे साहेब व विजय वड्डेटीवार साहेब यांची भेट घेऊन परतूर-मंठा मतदार संघातील विविध विषयावर चर्चा केली...1
- आज आम्ही परतूर ला गेलो होतो किडणी स्टोन च आयुर्वेद औषध घ्यायला तेथे आम्हाला दत्त मंदिर दिसले 🙏🏻1
- ✌️🏆सत्कार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा... नूतन विद्यालय सेलू1
- ⭕ सेलू कापूस बाजार भाव आजचे | कापूस बाजार भाव आजचे |kapus bajar bhav today1
- इमोट शॉट |फ्री फायर |ट्रेंडिंग में|कलर| रीडिंग |सेलू| स्मू |थमौसम|शॉर्ट1
- ⭕मानवत कापूस बाजार भाव आजचे | सेलू कापूस बाजार भाव | kapus bajar bhav today1