logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोल बाजार परिसरातील दुकानातून 70 किलो प्लास्टिकचा साठा जप्त: मनपा पथकाची कारवाई चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू असून उपद्रव शोध (NDS) पथकाद्वारे गोल बाजार परिसरातील दुकानातून एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मंगळवार 10 मार्च रोजी दुपारी सुमारे 3 वाजता गोल बाजार येथील कोमल ट्रेडर्स या दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात 3 पोत्यांमध्ये अंदाजे 70 किलो एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. शासन निर्णयानुसार अशा प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे सदर साठा जागेवर जप्त करण्यात आला. तसेच संबंधित दुकान मालकाकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.ही कारवाई सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा पथक प्रमुख शुभम खोटे, शुभम चिंचेकर व राहुल गगपल्लिवार यांनी केली. शहरात एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मनपाकडून अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

3 hrs ago
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
2ae0e973-3281-4288-a778-03bfb4bd039e

गोल बाजार परिसरातील दुकानातून 70 किलो प्लास्टिकचा साठा जप्त: मनपा पथकाची कारवाई चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू असून उपद्रव शोध (NDS) पथकाद्वारे गोल बाजार परिसरातील दुकानातून एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मंगळवार 10 मार्च रोजी दुपारी सुमारे 3 वाजता गोल बाजार येथील कोमल ट्रेडर्स या दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात 3 पोत्यांमध्ये अंदाजे 70 किलो एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. शासन निर्णयानुसार अशा प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे सदर साठा जागेवर जप्त करण्यात आला. तसेच संबंधित दुकान मालकाकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.ही कारवाई सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा पथक प्रमुख शुभम खोटे, शुभम चिंचेकर व राहुल गगपल्लिवार यांनी केली. शहरात एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मनपाकडून अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .
    1
    चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...
    1
    चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    1
    ಹಾನಗಲ್.  ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ.  ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ  ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    user_Mallikarjun sunagar
    Mallikarjun sunagar
    ಈಗಾಗಲೇ ಪತ್ರಿಕೆ ವರದಿಗಾರನಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಣೆ समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi
    1
    देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया।
#indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
    1
    वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद
हिंगणघाटः वर्धा
वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली.
या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • चंद्रपुरात 5 मार्चपासून पर्यावरणवादी बंडू धोतरे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, वाघाच्या अधिवासात लोहारडोंगरी खाणीला सरकारने मंजुरी दिल्यामुळे ती मंजुरी रद्द करावी या मागणीसाठी धोतरे यांचे आंदोलन सुरू आहे. 9 मार्च रोजी पोलीस प्रशासनाने त्यांना आंदोलन मंडपातून बळजबरीने रुग्णालयात दाखल करीत त्यांचे आंदोलन दडपण्याचा एक प्रयत्न केला, आज धोतरे यांनी रुग्णालयातून नागरिकांना आवाहन केले की माझं अन्नत्याग आंदोलन हे सुरूच राहणार हा लढा थांबणार नाही नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
    1
    चंद्रपुरात 5 मार्चपासून पर्यावरणवादी बंडू धोतरे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, वाघाच्या अधिवासात लोहारडोंगरी खाणीला सरकारने मंजुरी दिल्यामुळे ती मंजुरी रद्द करावी या मागणीसाठी धोतरे यांचे आंदोलन सुरू आहे. 9 मार्च रोजी पोलीस प्रशासनाने त्यांना आंदोलन मंडपातून बळजबरीने रुग्णालयात दाखल करीत त्यांचे आंदोलन दडपण्याचा एक प्रयत्न केला, आज धोतरे यांनी रुग्णालयातून नागरिकांना आवाहन केले की माझं अन्नत्याग आंदोलन हे सुरूच राहणार हा लढा थांबणार नाही नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.