logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव व शेगावमधील घरफोडीचा छडा; जालना येथील अट्टल गुन्हेगार गजाआड ​स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त ​खामगाव: खामगाव आणि शेगाव शहरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि खामगाव शहर पोलीस पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी रवि राजूमल होतबानी (रा. सिंधी कॉलनी, खामगाव) यांनी तक्रार दिली होती की, २४ ते २५ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या काकांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशाच प्रकारचा गुन्हा शेगाव येथेही घडला होता. ​जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर आणि खामगाव शहरचे पोनि. रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाअंती या गुन्ह्यामागे जालना येथील गुन्हेगाराचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून संजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ३० वर्ष, रा. जालना) याला जालना येथून ताब्यात घेतले. ​पोलिसांनी आरोपीकडून ​सोन्याचे दागिने ३० ग्रॅम वजनाचे ४,५०,०००/- रु.),(स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी (किंमत ३,५०,०००/- रु.),​मोबाईल २०,०००/- रु.), असा एकूण ८,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ​पकडण्यात आलेला आरोपी संजयसिंग भादा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याच्या शोधात होते. प्राथमिक चौकशीत त्याने खामगाव आणि शेगाव येथील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. ​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, पोनि. रामकृष्ण पवार, पोउपनि. पंकज सपकाळे, सपोनि. विकास पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

on 17 February
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
on 17 February
56d2ed3e-6fed-4a1a-bc36-40f97ac8d641

खामगाव व शेगावमधील घरफोडीचा छडा; जालना येथील अट्टल गुन्हेगार गजाआड ​स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त ​खामगाव: खामगाव आणि शेगाव शहरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि खामगाव शहर पोलीस पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी रवि राजूमल होतबानी (रा. सिंधी कॉलनी, खामगाव) यांनी तक्रार दिली होती की, २४ ते २५ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या काकांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशाच प्रकारचा गुन्हा शेगाव येथेही घडला होता. ​जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर आणि खामगाव शहरचे पोनि. रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाअंती या गुन्ह्यामागे जालना येथील गुन्हेगाराचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून संजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ३० वर्ष, रा. जालना) याला जालना येथून ताब्यात घेतले. ​पोलिसांनी आरोपीकडून ​सोन्याचे दागिने ३० ग्रॅम वजनाचे ४,५०,०००/- रु.),(स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी (किंमत ३,५०,०००/- रु.),​मोबाईल २०,०००/- रु.), असा एकूण ८,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ​पकडण्यात आलेला आरोपी संजयसिंग भादा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याच्या शोधात होते. प्राथमिक चौकशीत त्याने खामगाव आणि शेगाव येथील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. ​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, पोनि. रामकृष्ण पवार, पोउपनि. पंकज सपकाळे, सपोनि. विकास पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.
    1
    छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • न्याय मिळाला नाही, शेवटी एसडीओ कार्यालयात विष प्राशन! ५ आदिवासी शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आत्महत्येचा प्रयत्न राजुरा (चंद्रपूर), एप्रिल २०२६ : १५ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे. कुसुंबी (कोरपना तालुका) गावातील कोलाम आदिवासी समाजातील पाच शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक)च्या चुनखडी खाणीसाठी दिलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या १५ वर्षांपासून वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. घटना कशी घडली? दुपारी सुमारे १.३० वाजता हे पाचही शेतकरी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात आपल्या मागण्या घेऊन गेले होते. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. राजुरा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शेतकरी कोण आहेत? हे सर्व कोलाम आदिवासी कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने खाणीच्या उद्देशाने घेतल्या होत्या. कंपनीने प्रारंभी काही मोबदला दिला, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अपुरा आणि अपुरा होता. उर्वरित मोबदला किंवा जमीन परत मिळण्याची मागणी ते १५ वर्षे करत आहेत. प्रशासनाची भूमिका घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. ही घटना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन हक्क, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. “न्याय मिळाला नाही तर शेवटी विष प्यावे लागते,” अशी भावना व्यक्त करणारी ही घटना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांची दुखरी आठवण करून देते. अधिक अपडेटसाठी : शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासन लवकरात लवकर न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (ही बातमी विविध वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रकृती आणि प्रशासकीय कारवाईबाबत अधिक माहिती येत राहील.)
    1
    न्याय मिळाला नाही, शेवटी एसडीओ कार्यालयात विष प्राशन!
५ आदिवासी शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आत्महत्येचा प्रयत्न
राजुरा (चंद्रपूर), एप्रिल २०२६ : १५ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे.
कुसुंबी (कोरपना तालुका) गावातील कोलाम आदिवासी समाजातील पाच शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक)च्या चुनखडी खाणीसाठी दिलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या १५ वर्षांपासून वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे.
घटना कशी घडली?
दुपारी सुमारे १.३० वाजता हे पाचही शेतकरी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात आपल्या मागण्या घेऊन गेले होते. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. राजुरा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
शेतकरी कोण आहेत?
हे सर्व कोलाम आदिवासी कुटुंबातील शेतकरी आहेत.
त्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने खाणीच्या उद्देशाने घेतल्या होत्या.
कंपनीने प्रारंभी काही मोबदला दिला, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अपुरा आणि अपुरा होता. उर्वरित मोबदला किंवा जमीन परत मिळण्याची मागणी ते १५ वर्षे करत आहेत.
प्रशासनाची भूमिका
घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
ही घटना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन हक्क, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. “न्याय मिळाला नाही तर शेवटी विष प्यावे लागते,” अशी भावना व्यक्त करणारी ही घटना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांची दुखरी आठवण करून देते.
अधिक अपडेटसाठी : शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासन लवकरात लवकर न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
(ही बातमी विविध वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रकृती आणि प्रशासकीय कारवाईबाबत अधिक माहिती येत राहील.)
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भोकरदन मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित.
    1
    भोकरदन मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब  दानवे,आमदार संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    15 hrs ago
  • 🔥 परतवाड्यात धडाकेबाज कारवाई! आरोपी आयान अहमदच्या घरावर बुलडोझर फिरला 🔥 अमरावतीच्या परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल करून खळबळ उडवणारा आरोपी आयान अहमद रिजवान अहमद याच्या घरावर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश दिला जात आहे. 🚨
    1
    🔥 परतवाड्यात धडाकेबाज कारवाई! आरोपी आयान अहमदच्या घरावर बुलडोझर फिरला 🔥
अमरावतीच्या परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल करून खळबळ उडवणारा आरोपी आयान अहमद रिजवान अहमद याच्या घरावर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवला.
या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश दिला जात आहे. 🚨
    user_Gaurishankar Dhikar
    Gaurishankar Dhikar
    Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    23 hrs ago
  • वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    2
    वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना  शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई! (अमरावती - १५ एप्रिल २०२६) परतवाडा (अमरावती) : अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून फसवून लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि ३५०+ अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर (१९ वर्षे, उर्फ आयान अहमद तनवीर) याच्या घराचा अतिक्रमित भाग आज बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. मुख्य घटना: अतिक्रमित बांधकाम पाडले: अचलपूर नगर परिषदेच्या बुलडोझरने घराचा लोखंडी जिना आणि पहिल्या मजल्याचा काही भाग पाडला. पूर्ण घर नव्हे, तर फक्त अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. आधी नोटीस देण्यात आली होती.38d499 भाजप आमदार उपस्थित: आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. परिसरात मोठी पोलिस तैनाती होती.70f5d5 प्रकरणाची पार्श्वभूमी: आरोपीने व्हॉट्सअप, स्नॅपचॅट द्वारे १८०+ अल्पवयीन मुलींना “लव्ह ट्रॅप” मध्ये फसवले. मुंबई-पुणे येथे नेऊन अश्लील व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल केले आणि व्हायरल केले. आतापर्यंत ८+ बळी ओळखले गेले, शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात. POCSO Act, IT Act, BNS 294 अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीसह ४ जण अटक; इतरांवर तपास सुरू.334c3d प्रतिक्रिया: परतवाडा-अचलपूरमध्ये बंद पाळला गेला. मोठा जन-रोष, SIT चौकशीची मागणी. खासदार अनिल बोंडे यांनीही प्रकरण गंभीर घेतले. पोलिसांनी सांगितले: तपास सुरू असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पीडित मुलींची ओळख पटवणे आणि फॉरेन्सिक तपास चालू आहे. !
    1
    परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई!
(अमरावती - १५ एप्रिल २०२६)
परतवाडा (अमरावती) : अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून फसवून लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि ३५०+ अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर (१९ वर्षे, उर्फ आयान अहमद तनवीर) याच्या घराचा अतिक्रमित भाग आज बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला.
मुख्य घटना:
अतिक्रमित बांधकाम पाडले: अचलपूर नगर परिषदेच्या बुलडोझरने घराचा लोखंडी जिना आणि पहिल्या मजल्याचा काही भाग पाडला. पूर्ण घर नव्हे, तर फक्त अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. आधी नोटीस देण्यात आली होती.38d499
भाजप आमदार उपस्थित: आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. परिसरात मोठी पोलिस तैनाती होती.70f5d5
प्रकरणाची पार्श्वभूमी:
आरोपीने व्हॉट्सअप, स्नॅपचॅट द्वारे १८०+ अल्पवयीन मुलींना “लव्ह ट्रॅप” मध्ये फसवले.
मुंबई-पुणे येथे नेऊन अश्लील व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल केले आणि व्हायरल केले.
आतापर्यंत ८+ बळी ओळखले गेले, शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात.
POCSO Act, IT Act, BNS 294 अंतर्गत गुन्हा दाखल.
आरोपीसह ४ जण अटक; इतरांवर तपास सुरू.334c3d
प्रतिक्रिया:
परतवाडा-अचलपूरमध्ये बंद पाळला गेला.
मोठा जन-रोष, SIT चौकशीची मागणी.
खासदार अनिल बोंडे यांनीही प्रकरण गंभीर घेतले.
पोलिसांनी सांगितले: तपास सुरू असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पीडित मुलींची ओळख पटवणे आणि फॉरेन्सिक तपास चालू आहे.
!
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सिल्लोड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले भाषण व अनेक वर्षापासून निमित्त महापुरुषांच्या जयंती निमित्त ते भाषण करतात मात्र अनेक वर्षांचा अनुभव यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला आहे
    1
    सिल्लोड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले भाषण व अनेक वर्षापासून निमित्त महापुरुषांच्या जयंती निमित्त ते भाषण करतात मात्र अनेक वर्षांचा अनुभव यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ​अंधारीत भीमजयंतीचा उत्साह; ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ​सिल्लोड (प्रतिनिधी): सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. ​पुष्पहार अर्पण व अभिवादन सोहळा ​कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मंडळांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ​सामाजिक सलोख्याचे दर्शन ​यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. "केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
    3
    ​अंधारीत भीमजयंतीचा उत्साह; ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
​सिल्लोड (प्रतिनिधी):
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.
​पुष्पहार अर्पण व अभिवादन सोहळा
​कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मंडळांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
​सामाजिक सलोख्याचे दर्शन
​यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. "केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
    user_SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.