गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात आज काँग्रेस पक्षाचे आंदोलन...! नांदेड - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडर मध्ये प्रतिनग ६० रूपये दर वाढ केली असुन सर्व सामान्यांच आर्थिक कंबरडे मोडले आहे. या दरवाढी विरोधात उद्या गुरूवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. या धरणे आंदोलनात नांदेड जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवा दल, एन एस यु आय ओबीसी सेल आदी विविध सेलच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस (उतर) चे अध्यक्ष श्री राजेश पावडे, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दूल सत्तार, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, काँग्रेस महानगर सरचिटणीस आनंद कल्याणकर यांनी केले आहे.
गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात आज काँग्रेस पक्षाचे आंदोलन...! नांदेड - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडर मध्ये प्रतिनग ६० रूपये दर वाढ केली असुन सर्व सामान्यांच आर्थिक कंबरडे मोडले आहे. या दरवाढी विरोधात उद्या गुरूवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. या धरणे आंदोलनात नांदेड जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवा दल, एन एस यु आय ओबीसी सेल आदी विविध सेलच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस (उतर) चे अध्यक्ष श्री राजेश पावडे, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दूल सत्तार, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, काँग्रेस महानगर सरचिटणीस आनंद कल्याणकर यांनी केले आहे.
- *नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;* *महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री* *मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी* नांदेड दि. 10 मार्च :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने रेणुका महोत्सव 2026 निमित्त ‘मिनी सरस’प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. या मिनी सरस मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. मेळाव्यात दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य व माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक मेघना कावली तसेच उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.1
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील1
- भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.2
- महापालिकेच्या 'अतिक्रमण' मोहिमेचा फार्स; स्वतःच्या दारातील स्वच्छता, मात्र शहरात अतिक्रमणाचा विळखा कायम! नांदेड: महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची सध्याची कार्यपद्धती म्हणजे 'दिवाखाली अंधार' अशी झाली आहे. महापालिका प्रशासन केवळ आपल्या मुख्य कार्यालयाच्या आसपासच्या भागातील अतिक्रमण हटवून कारवाईचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, शहरातील इतर मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले असून, पथक मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षपाती कारवाईचा संताप महानगरपालिकेचे पथक ठराविक भागांतच फिरताना दिसते. केवळ महापालिकेच्या बाजूचे रस्ते मोकळे करून आपण खूप मोठे काम केले आहे, अशा आविर्भावात प्रशासन वावरत आहे. या 'कलगीतुऱ्या'मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाला फक्त आपल्या कार्यालयाचा परिसर सुशोभित ठेवायचा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शहराच्या इतर भागांत अतिक्रमणाचे साम्राज्य शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागांत पदपथांवर फेरीवाले, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांनी पाय ठेवायला जागा उरलेली नाही. * वाहतूक कोंडी: रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहनांच्या रांगा लागत आहेत. * पथक आहे की सुस्त? शहराच्या इतर भागात जेव्हा नागरिक तक्रारी करतात, तेव्हा अतिक्रमण पथक कुंभकर्णी झोपेत असल्याचे भासते. नागरिकांची मागणी "अतिक्रमण काढायचे असेल तर ते संपूर्ण शहराचे काढावे, फक्त स्वतःच्या इमारतीभोवती कारवाई करून प्रशासन काय साध्य करत आहे?" असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. जर लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांवरील हे अतिक्रमण हटवले नाही, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आता महापालिका आयुक्त या सुस्त यंत्रणेला जागे करून संपूर्ण शहरात समान कारवाई करण्याचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1