सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत द्या – अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर नांदेड, दि. १३ मार्च : स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रगतीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी नियमानुसार व वेळेत करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. हदगाव नगर परिषदेअंतर्गत प्रलंबित प्रकरणावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष डागोर यांनी दिल्या. तसेच समितीनुसार असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष शिबिरे आयोजित करून आयुष्मान भारत कार्ड व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत घरकुल, समाजकल्याण विभागाच्या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती, साप्ताहिक सुटी, नियमित वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित लाभ तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना अध्यक्ष डागोर यांनी सांगितले की, भविष्यात सफाई कर्मचारी कंत्राटी न राहता त्यांना नियमित कर्मचारी करण्यावर भर देण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी समन्वयाने कार्य करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल, अशी ग्वाही दिली. प्रारंभी नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली.
सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत द्या – अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर नांदेड, दि. १३ मार्च : स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रगतीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी नियमानुसार व वेळेत करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात
आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. हदगाव नगर परिषदेअंतर्गत प्रलंबित प्रकरणावर येत्या आठ
दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष डागोर यांनी दिल्या. तसेच समितीनुसार असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष शिबिरे आयोजित करून आयुष्मान भारत कार्ड व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत घरकुल, समाजकल्याण विभागाच्या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. याशिवाय सफाई
कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती, साप्ताहिक सुटी, नियमित वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित लाभ तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना अध्यक्ष डागोर यांनी सांगितले की, भविष्यात सफाई कर्मचारी कंत्राटी न राहता त्यांना नियमित कर्मचारी करण्यावर भर देण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी समन्वयाने कार्य करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल, अशी ग्वाही दिली. प्रारंभी नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली.
- जिल्हाधीकारी वर्षा ठाकुर-घुगे यांचा निरोप समारंभ आणि नुतन जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांचा स्वागत समारंभ घेण्यात आला. पक्षी मित्र महेबूब चाचा यांनी मानले आभार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ऑफीसर कल्ब येथे आयोजीत करण्यात आला होता. या निरोप समारंभ आणि स्वागत समारंभास पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उप जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार सौदागर तांदळे, सर्व तलाटी वर्ग, शासकीय अधिकारी, कर्मचारी सोबत बरीच मान्यवर मंडळी यावेळी उपस्थीत होते. याप्रसंगी पक्षी मित्र महेबूब चाचा हे एका अती सामान्य व गरीब कुटुंबातून आलेला माणूस जो लातूर शहरातील जखमी पक्षांची सेवा करतो व वृक्षांच्या सानिध्यात त्यांना सोडून देतो तसेच कोणतेही प्राणी जखमी असेल त्याला आपल्या घरी घेऊन येऊन त्याची सेवा करतो अशा सामान्य मनुष्यास जिल्हाधिकारी मॅडम वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्टेजवरुन त्याच्यां नावानिसी बोलावत त्याच्या कार्याचे कौतुक करून आपण शुभेच्छा द्यायला आल्या बद्दल मनापासुन आभार मानत त्यांच्या नातीच्या डोक्यावरुन मायेचा हाथ फिरवित बेटा कौनसे स्कुल मे पढते हो म्हणुन अदबीने विचारत "पढ लिखकर बडे अफसर बनो" म्हणुन तिला आशिर्वाद देत आजोबा आणि नातीचा सन्मान करण्यात आला. सन्मान केल्याने पक्षी मित्र महेबूब चाचा यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम व नूतन जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांचे आभार मानले.4
- जालना – मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑप बँक लि., जालना यांच्या वतीने सर्व सभासद, ग्राहक व ठेवीदारांना एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., डोंबिवली (पूर्व) मध्ये विलिनीकरण (मर्जर) होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विलिनीकरण प्रक्रियेनंतर बँकेत असलेल्या चालू, बचत तसेच सर्व प्रकारच्या मुदत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहून त्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा भीती (पॅनिक) न बाळगता बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक प्रशासनाने सर्व ग्राहकांना शांतता व विश्वास ठेवण्याचे आवाहन करत, विलिनीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.1
- आज दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 8:45 ते 8:47 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवला. प्राप्त माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली परिसरात (अक्षांश 19.533, रेखांश 77.202) सुमारे 10 किमी खोलीवर असल्याचे नोंद आहे. या भूकंपाचे धक्के डोंगरगाव, मोरथ, वाकोडी, मुळावा, उमरखेड तसेच नांदेड व आसपासच्या भागातही जाणवले. काही ठिकाणी नागरिकांना 2 ते 3 सेकंदांपर्यंत कंप जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मुळावा येथे भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक घराबाहेर पडले. दरम्यान, मोरथ येथील हनुमान मंदिरात शनिवारी निमित्त महाप्रसाद कार्यक्रम सुरू असताना उपस्थित 40 ते 50 ग्रामस्थांनाही भूकंपाचे झटके जाणवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.3
- दारव्हा तालुक्यातील दारव्हा, बोरी, बोदेगाव आदी भागांतील गॅस एजन्सींमार्फत होणाऱ्या सिलेंडर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गॅस बुकिंगनंतर १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी सिलेंडर न मिळताच डिलिव्हरीचे संदेश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस व पेट्रोलचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असतानाही एजन्सींवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. गोडाऊनमध्ये साठा असूनही पुरवठा होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींच्या साठ्याची सखोल चौकशी करून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.1
- वाशी APMC मध्ये थरार! काही वेळात कामगारांनी वाचवला महिलेचा जीव नवी मुंबईतील APMC वाशी धान्य बाजारात एक थरारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. काही सेकंद उशीर झाला असता, तर एका महिलेचा जीव गमावला गेला असता. दुपारच्या सुमारास एक महिला गोदामात स्वच्छतेचं काम करत होती. त्याच वेळी वर रचलेली जड धान्याची पोती अचानक कोसळली आणि क्षणातच ती महिला पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. हा प्रकार इतक्या झटक्यात घडला की आजूबाजूच्या लोकांना काही कळण्याआधीच सर्व काही घडलं. मात्र, महिलेचा आवाज ऐकताच तिथे काम करणाऱ्या कामगारांनी विलंब न करता धाव घेतली. त्यांनी तातडीने एक-एक पोतं हटवायला सुरुवात केली आणि अवघ्या काही क्षणांतच त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढलं. या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला असून, कामगारांची चपळता आणि एकजूट स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या तत्परतेमुळेच मोठा अनर्थ टळला. महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने तिला किरकोळ दुखापत झाली आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना केवळ अपघाताची नसून, कठीण प्रसंगी माणुसकी आणि धाडस दाखवणाऱ्या खऱ्या हिरोंची जिवंत उदाहरण आहे. योग्य वेळी पुढे येणारे हातच एखाद्याचा जीव वाचवू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.1
- जऊळका रेल्वे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर’1
- एसटी तिकिटातील शिल्लक 9 रुपये मागितल्याने कंडक्टरने केली प्रवाशास अमानुष मारहाण. कंडक्टरने प्रवाशास गाडीच्या खाली उतरवीत केली गुंडगिरी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या तालुक्यातील पाडळी ते बेल्हे एसटी प्रवासात आज घडलेला एक प्रसंग आज चांगलाच चर्चेत आलेला आहे. बसस्थानकावर एसटी बस मधील प्रवाशाचे रोजच्याप्रमाणे 20 रुपये देऊन 11 रुपयाचे तिकीट कंडक्टर कडे घेऊन त्याला 09 रुपये वापस मिळाले नसल्याने प्रवाशांनी बसस्थानकावर बस पोहोचल्याने शांतपणे प्रवाशाने आपले उर्वरित राहिलेले हक्काचे 09 रुपये कंडक्टर कडे बागणी केली त्याचे येणे असल्याने त्याने ही 09 रुपये मागणी केली असता या साध्या प्रश्नावरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वातावरण चांगलेच तापले होते काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कंडक्टर आणि त्या प्रवाशांमध्ये धरपकड वादावादी झाली या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ तेथील प्रवाशाने काढल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हक्काचे नऊ रुपये मागितल्याने कंडक्टर ने प्रवाशास पैसे न देता मारहाण करण्यात आली. उरलेले 9 रूपये कंडक्टर कडे मागितले म्हणून कंडक्टर ने प्रवाश्याला केसाला धरत घेरे वर याला म्हणत प्रवाशास केली मारहाण, जुन्नरच्या तालुक्यातील पाडळी ते बेल्हे बसप्रवासात हा प्रकार घडला आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला स्थानिकांचा तिव्र विरोध असतांनाही प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकरी आता रस्त्यावर उतरले आहे. सरकारच्या धोरणाचा निषेध करण्याकरिता राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने नागपूर तुळजापुर हा राष्ट्रीय महामार्ग हा रोखून धरण्यात आला.1
- माझे नाव:हनुमंत भिकाजी शिंदे. राहणार पालसिंगण तालुका जिल्हा बीड योजनेचा अर्धवट कामावर ग्रामपंचायत कार्यालय ते थेट राष्ट्रपती भवना पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने वारंवार तक्रारी केलेले आहेत यापैकी महा जलसमाधान या वेबसाईटवर देखील ऑनलाइन तक्रार केलेली आहे या तक्रारीचे स्टेटस तपासले असतात तक्रारीचे समाधान केल्याचे दिसत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही मग माझ्या तक्रारीचे असे स्टेटस दाखवून प्रशासनाला नेमकं सिद्ध काय करायचं आहे1