अहिल्यानगर एमआयडीसीत उद्योजकाकडून खंडणी उकळणारा आरोपी अटकेत अहिल्यानगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकास धमकावून खंडणी उकळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 09/02/2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजता निंबळक एमआयडीसी, प्लॉट क्रमांक 07 व 08 येथील सुयश मेटल प्रोसेसिंग्स प्रा. लि. या कंपनीत अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व इतर चार अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करून काम बंद पाडले तसेच काम सुरू ठेवायचे असल्यास दरमहा एक लाख रुपये देण्याची मागणी केली. यावेळी धमकावून 20 हजार रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच कामगारांना संबंधित संघटनेस मान्यता देण्यासाठी चिथावणी दिल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर संबंधित उद्योजकांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 118/2026 नोंद करून भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस नोंदीनुसार आरोपीवर यापूर्वी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यांत खून, मारहाण, सरकारी कामात अडथळा, शस्त्र कायदा आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी परिसरातील उद्योजक व कामगारांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही त्रास देत असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून संरक्षण दिले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

- रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.1
- Post by शहादेव काशिनाथ वैद्य3
- (प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, हाडे, रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आल्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपतींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्तदान हेच जीवनदान असून प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रक्तदाते, नागरिक, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले.1
- आंदोलन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल1
- मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.1
- भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.1
- येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया व घोषणा बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. - रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.4
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1